Manoj Jarange | ‘आधी गावबंदी, आता..’ जरांगेंकडून मराठ्यांना नवं आवाहन

0
19

Manoj Jarange |  मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा उपोषण करतांना मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना गावबंदीचे आवाहन केले होते. दरम्यान, आता त्यांनी मराठा समाजाला पुन्हा एक नवीन आवाहन केले आहे. दिवाळीचं फराळ खाण्यासाठी नेत्यांकडे जाणार असाल तर, आधी त्यांना मराठा आरक्षणाचा जाब विचारा, त्यांना मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्यासाठी आठवण द्या. असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “राजकीय नेते दिवाळी निमित्त फराळाचे कार्यक्रम ठेवतील. त्यामुळे या कार्यक्रमांना जर मराठा लोकं जात असतील, तर त्यांनी नेत्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात आणून द्यावा. तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आवाज उठवा असे या नेत्यांना सांगा, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. तसेच, येणाऱ्या अधिवेशनात सर्व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवलाच पाहिजे, असेही या नेत्यांना सांगण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

 Crime news | मालेगावात लाखोंचा भेसळयुक्त मसाला, मिरची पावडर जप्त

अजित पवारांच्या दिल्ली भेटीबद्दल

अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट नेमकी कशासाठी घेतली याबाबत अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. ही भेट मराठा आरक्षणासाठी होती की, त्यांच्या इतर वैयक्तिक कामासाठी होती हा त्यांचा विषय आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी भेट घेतली असेल तर चांगलंच आहे. तसेच, महाराष्ट्रामधील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची चर्चा झाली असावी अशी अपेक्षा करतो. पण, ही त्यांची वैयक्तिक भेट असेल तर यात आम्हाला पडायचं नाही, असेही यावेळी जरांगे म्हणाले.

राजघराण्यांकडील नोंदी तपासाव्यात

दरम्यान, यावेळी कुणबी नोंदीबाबत देखील मनोज जरांगे यांनी मागणी केली आहे. “राज्यातील राजघराण्यांकडे असलेली जुनी कागदपत्रे तपासावीत, जेणेकरून याबाबत आणखी नोंदी सापडतील. त्यामुळे, राज्यातील राज घराण्यांना मी आवाहन करतो की, आपल्याकडील जुनी कागदपत्रे समितीला अथवा अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जरांगे यांनी राजघराण्यांना केले.

Nashik | पनीर खरेदी करतांय… तर सावधान! नाशकात 397 किलो बनावट पनीर केले हस्तगत


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here