FDA Raid अन्न व औषध प्रशासन नाशिक पथकाने तपोवन येथील मेसर्स देवीकृपा फूड प्रॉडक्ट्स या फरसाण उत्पादकाच्या कारखान्यावर धाड टाकत १ लाख ११ हजार ५५० रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.(FDA Raid)
या ठिकाणी अन्नपदार्थाचे विनापरवाना उत्पादन व विक्री करत असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून लसूण फरसाण, मद्रास फरसाण, लाल शेव, पिवळी शेव, भावनगरी शेवचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.(FDA Raid)
या मोहिमेत एकूण पाच अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सदरची धडक मोहीम ही यापुढेही सुरू राहणार आहे. अन्न व्यवसायिकांनी फरसाण उत्पादकांनी आवश्यक परवाना घेऊन परिशिष्ट चार अंतर्गत तरतुदींचे पालन करून व्यवसाय करावा. तसेच उत्पादन साठवून वाहतूक व विक्री आरोग्यदायी वातावरणात करण्याबाबत निर्देश प्रशासनाने दिले.(FDA Raid)
यावेळी फरसाण उत्पादकांनी अन्नपदार्थात भेसळ करू नये, भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल तसेच मेसर्स देवी कृपा फूड प्रॉडक्ट्स या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या पेढीस ज्या विक्रेत्यांनी कच्चे अन्नपदार्थ विक्री केले आहेत. त्यांच्यावर देखील नियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.(FDA Raid)
यावेळी नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहनही करण्यात आले. फरसाण खरेदी करताना लेबल वरील मजकूर तपासून खरेदी करावे व पक्के बिल घ्यावे भेसळयुक्त फरसाण किंवा इतर अन्नपदार्थ संबंधी माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क करावा ही कारवाई संजय नारागुडे (सह आयुक्त नाशिक विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली मनीष सानप (सहाय्यक आयुक्त (अन्न)) अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर व अविनाश दाभाडे (गुप्त वार्ता शाखा) यांनी केली.(FDA Raid)
काही तास आधीच अन्न व औषध प्रशासनाकडून नाशिक मधील नवीन नाशिक परिसरात भाडे ताकद पनीर जप्त करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वी शहरातील जवळपास आठ नामांकित हॉटेल्स वर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा विनापरवाना सुरू असलेल्या फरसाण कारभार कारखान्यावर कारवाई करण्यात आल्याने अवैध पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे चांगले दणाणले आहे. तर नागरिकांनी देखील वस्तू विकत घेत असतांना काळजी घेण्याच आवाहन करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम