कांद्याचे भाव गडगडले शेतकरी उद्या लिलाव पाडणार बंद

0
11

देवळा ; उन्हाळी कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने याचा निषेध म्हणून उद्या दि २३ रोजी देवळा बाजार समितीच्या मार्केट यार्डात प्रहारच्या वतीने कांदा लिलाव बंद करून पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे .

पत्रकाचा आशय असा कि , उन्हाळी कांद्याला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला आहे . मात्र , या कांदयाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे . खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडा आहे . सद्या कांदयाला ७ ते ८ रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचा सूर उमटला असून , उन्हाळी कांदयाला कमीत कमी ३० रुपये किलो दर मिळावा ,अशी मागणी पत्रकात केली आहे.

या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दि २३ रोजी सकाळी देवळा बाजार समितीच्या यार्डात कांदा लिलाव बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे . यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे ,असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे , युवा तालुका अध्यक्ष बापू देवरे ,युवा तालुका अध्यक्ष शशिकांत पवार यांनी केले आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here