Weather Update| शेतकऱ्यांनो..! रहा निश्चिंत..चक्रीवादळामुळे राज्यात अवकळी पाऊस नाही…

0
30

Weather Update|भारतातील चार राज्यांत ईशान्य हिवाळी मॉन्सून सुरु होणार आहे. नैर्ऋत्य मॉन्सूनने परतीच्या प्रवासात चार दिवसांच्या वास्तव्यातही महाराष्ट्राला पाऊस दिला नाही. सप्टेंबर महिन्यात पूर्वा ते हस्त ह्या तीन नक्षत्रांचा पाऊस हा परतीचा पाऊस समजण्याची गफलत शेतकरी करतात. कारण, तो नैर्ऋत्य मॉन्सूनचा पाऊस असतो. दक्षिणेकडील चार राज्यांत सुरू असलेल्या ईशान्य माॅन्सूनचा पाऊस बघता आपल्याकडेही पाऊस होऊ शकतो, अशी कल्पना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनात आहे.

येत्या पंधरवड्यात चक्रीवादळ येणार, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस होईल का?

अरबी समुद्रात केरळमधील कोचीन-अल्लेप्पी अक्षवृत्ताच्या दरम्यान आणि लक्षद्विप बेटांच्या अति पश्‍चिमेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते २६ ऑक्टोबरनंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होऊन ओमानच्या दिशेने निघून जाईल अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पाऊस होईल असे दिसत नाही. दक्षिण पाकिस्तान किंवा कच्छ किनारपट्टीमार्गे देशाच्या भू-भागावर चक्रीवादळ येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या कोणत्याही चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होईल आणि पाऊस पडेल, अशी शक्यता सध्या तरी नाही.

Jejuri| जेजूरीत पुन्हा होणार येळकोट…! अखेर भाविकांसाठी मंदिर खुले…पण का होते मंदिर बंद..?

नोव्हेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल, यात तथ्य आहे का?

 नोव्हेंबर महिन्यात पावसाचा अंदाज हे एक काहीनी केलेलं भाकीत आहे. दक्षिण भारतात सुरू असणाऱ्या ईशान्य माॅन्सूनच्या प्रणाल्यांतून एखादी प्रणाली महाराष्ट्रात पोहोचली किंवा बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ रस्ता बदलून महाराष्ट्राच्या दिशेने झुकले. तरच, महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात पाऊस होतो. पण, तो होतोच असं नाही. तसंच असं काही घडणार असेल तर आठ-दहा दिवस अगोदर ते कळतं. आणि त्यानुसार हवामान विभाग आगाऊ सूचनाही देतात.
रब्बी पेरण्यांचं काय?

रब्बीत ज्वारी, हरभरा, मका, लाल कांदा यांच्या लागवडी ह्या ऑक्टोबर महिना किंवा काही ठिकाणी त्या अगोदरही उरकतात. तर गहू, साठवणीचा गावठी उन्हाळ कांदा यांच्या लागवडी ह्या नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान होतात. पण, त्यासाठी आधी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये भरपूर पाऊस होणे अत्यंत गरजेचे असते. तसेच नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये बेमोसमी पाऊस आणि उत्तरेकडून थंडीचे लवकर येणेही तितकेच गरजेचे असते. तसेच भरपूर दिवस आकाश निरभ्रअसले पाहिजे तसेच २६ जानेवारी ते १५ मार्चपर्यंत गारपीट व्हायला नको. यंदा एल-निनोच्या वर्षात चांगल्या थंडीची अपेक्षा करूया. दरवर्षी प्रमाणेच १५ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात हळूहळू थंडी पडेल असे सध्या तरी वाटतेय. पण, एखादे चक्रीवादळ त्यात काय अडथळा आणू शकते का, यावर थंडीचे आगमन अवलंबून असेल.

Maharashtra politics| महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वारे फिरणार..? उद्या शक्तिप्रदर्शन होणार..?

येत्या पंधरवड्यात चक्रीवादळ येणार, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस होईल का?

अरबी समुद्रात केरळ राज्यातील कोचीन-अल्लेप्पी अक्षवृत्ताच्या दरम्यान पण लक्षद्विप बेटांच्याही अति पश्‍चिमेकडे आज कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते २६ ऑक्टोबरनंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होऊन ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता नाही. दक्षिण पाकिस्तान अथवा कच्छ किनारपट्टी ह्या मार्गाने देशाच्या भू-भागावर चक्रीवादळ येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या कोणत्याही चक्रीवादळाचा परिणाम होऊन महाराष्ट्रात पाऊस पडेल, अशी शक्यता सध्या तरी जाणवत नाही.(Weather Update)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here