Deola | देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ…

0
15

Deola | देवळा तालुक्यात गतवर्षीपेक्षा यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्यात जमा आहे. यानुसार महसूल विभागाने ५० पैशाच्या आत आणेवारी जाहीर केली असून कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून राज्यशासनाला पीक परिस्थितीच्या नुकसानीची आकडेवारी पाठविण्यात आलेली आहे. त्यानुसार देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळेल, अशी माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली आहे.

Ahmednagar Ashti Train | अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग…
देवळा तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नदी नाले, छोटे-मोठे पाझर तलाव कोरडी ठाक पडली आहेत. यामुळे खरीप हंगाम वाया गेलेला आहे. खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने पिकांची वाढ झालेली नाही.

याची कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी तालुक्याची पीक परिस्थितीची पाहणी करून जिल्हास्तरावर नुकसानीची आकडेवारी पाठवलेली आहे. तसा अहवाल राज्य शासनाकडे देखील प्राप्त झाला असून, यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून, ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या निकषानुसार शासनाच्या माध्यमातून लाभ देखील मिळणार असल्याची माहिती शेवटी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली आहे.

chandwad | चांदवडच्या स्वयंभू रेणुका मातेच्या पालखीची परंपरा…


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here