Farmer Subsidy scheme | पिकांवरील कीडनियंत्रणासाठी आता मिळणार अनुदान

0
32

Farmer Subsidy scheme | एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना विविध निविष्ठांची खरेदी करावी लागत असते. यात शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो. आता पीक संरक्षण औषधी, तणनाशके, जैविक खते, जैविक कीड नियंत्रणासाठी (Farmer Subsidy scheme) लागणाऱ्या कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 500 रुपये प्रमाणे कमाल 2 हेक्टरपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च काही प्रमाणात वाचणार आहे.

Crime news | प्रेयसीने फोन चेक केला; सापडले मुलींचे १३,००० नग्न फोटो

कशासाठी मिळत आहे अनुदान ?

पीक संरक्षण औषधी –

पिकाच्या संरक्षणासाठी पिकांवर फवारणी करण्यात येते. या फवारणीसाठी लागणाऱ्या औषधींसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

जैविक खते –

रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना जैविक खतांच्या (Farmer Subsidy scheme) वापरासाठी प्रोत्साहित केले जात असून, जैविक खतांसाठीही शेतकऱ्यांना पावतीची अट पूर्ण केल्यास अनुदान दिले जात आहे.

तणनाशके

तण नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या तणनाशक औषधीसाठीही शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. जैविक खतांप्रमाणेच जैविक कीड नियंत्रणासाठी लागणाऱ्या निविष्ठांकरीताही शेतकऱ्यांना अनुदान मिळत असल्याने त्यांचा खर्च कमी होत आहे.

चांदवड | पोलिसांची मोठी कारवाई; 50 लाखाचा गुटखा जप्त

कोणाला आणि किती मिळते अनुदान?

कृषी विद्यापिठाच्या शिफारशीनुसार निविष्ठांची खरेदी केल्यास अनुदान देय लागू आहे. एका शेतकऱ्याला कमाल 2 हेक्टर मयदिपर्यंत त्याचा लाभ मिळू शकतो. तर यासाठी 30 डिसेंबरची मुदत असून खरेदीची पावती आवश्यक याबाबतचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी 30 डिसेंबरपूर्वी सादर करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी निविष्ठा खरे त्याची खरेदी पावती, सातबारा, आधार कार बँक खात्याचा तपशील कागदपत्रे कृषी केंद्रात जमा करावे लागेल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here