माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आपल्या समर्थकांसह काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी येऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्तीही करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांनतर मुख्यमंत्र्यांनी हेगडे यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना सचिव संजय मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे हेदेखील उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम