EVM Machine | मतदान सुरू असतानाच अनेक ठिकाणी EVM मशीन बंद पडले..?

0
29
Vidhansabha Election
Vidhansabha Election

EVM Machine |  आज राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या टप्प्यात राज्यातील मोठ्या मतदार संघांमध्ये निवडणूक होणार आहे. दरम्यान, यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार, पुणे (Pune Loksabha election 2024) मावळ आणि शिरुर या मतदार संघांत अनेक ठिकाणी थेट EVM मशीनच बंद पडले आहेत.

त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदार ताटकळत रांगेत उभे असल्याचं चित्र दिसून आलं. EVM मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ मतदान बंद होते. दरम्यान, मतदान प्रक्रिया बंद असल्याने अनेक नागरिक ताटकळत उभे होते. तर, काहींनी मतदानाकडे पाठ फिरवली. दरम्यान, प्रशासनाकडून हे बंद मशीन दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येथे मोठा पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Sanjay Raut | मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले.!; मुख्यमंत्र्यांच्या गार्डसच्या हातात पैशांच्या बॅगा..?

त्यासोबतच तळेगाव दाभाडे येथेही गणेश वाचनालयातील EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान काही वेळासाठी बंद ठेवले होते. येथेही यावेळी नागरिकांना रांगेत काही वेळ उभं रहावं लागलं. मात्र कर्मचाऱ्यांनी आणि प्रशासनाने लगेच तत्काळ मशीन दुरुस्त केलं. येथे बियुमध्ये दोनदा तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे संपूर्ण युनिटच बदलावे लागले. काही काळ मतदान बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता मतदान सुरळीत सुरू करण्यात आले आहे.

EVM Machine | इतक्या ठिकाणी मशीन बंद 

१. याचीच पुनरावृत्ती टिंगरे नगर परिसरातही पाहायला मिळाली. मशीन बंद पडल्याने टिंगरे नगर बूथ क्रमांक १३२,१३३ येथील मतदानही बंद होते. यामुळे जवळपास १ तास मतदार रांगेत उभे होते.

२. तर, मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलच्या वेळीच २४ बॅलेट युनिट ६ कंट्रोल यूनिट आणि १४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलावे लागले.

३. शिरूर लोकसभा मतदारसंघातही मॉक पोलच्या वेळीच २४ बॅलेट युनिट ८ कंट्रोल यूनिट आणि २४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलावे लागले.

४. पुणे लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी ३७ बॅलेट युनिट १३ कंट्रोल यूनिट आणि १७ व्हीव्हीपॅट यंत्र बदलावे लागले.  दरम्यान, प्रशासनाने सुधारणा केल्यानंतर आता सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे.

Eknath Khadse | नाथाभाऊंची राजकारणातून निवृत्ती..?; केली मोठी घोषणा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here