Jammu and Kashmir| भारत-पाक सीमेवर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना…

0
27

 Jammu and Kashmir |  जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत साडे दहा फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा  पुतळा बसविण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शिवराय आता भारतीय सैन्यासाठी ऊर्जास्थान बनून त्यांच्या समोर उभे असणार आहेत. यामुळे भारतीय सैन्याचं मनोबलदेखील वाढणार आहे. यावेळी तेथील सैन्यदलाकडून छत्रपतींच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेतर्फे हा पुतळा तयार करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आज स्थापना करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते पूजन झालेला हा छत्रपतींचा पुतळा कुपवाडा येथे आणण्यात आला. त्यानंतर पुतळ्याची स्थापना करण्यात आली. यामुळे दहशतवाद्यांच्या मनात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची चांगलीच धडकी भरणार आहे.

Deola | तालुक्यात कालव्याच्या पाण्यावरून होऊ शकतं ‘तिसरं महायुद्ध’

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार..?

यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया देत. “भारत-पाकिस्तान सीमेवर त्या ठिकाणी आपल्या रेजिमेंटने यासंदर्भात ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेकडे भावना व्यक्त केली. तेव्हा महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं की, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत. राज्यपाल तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिवादन व पूजन करून महाराजांचा पुतळा जम्मू काश्मीरकडे रवाना झाला. २,२६८ किलोमीटर इतके अंतर असलेल्या कुपवाडमध्ये हा पुतळा आणला गेला. या पुतळ्याची येथे स्थापना करण्यात आली.

भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांना आपल्या देशाची शूरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने दिसेल.  त्यावेळी  निश्चितपणे आमच्या जवानांचा उत्साह वाढेल. शिवराय हे संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत. आपल्या जवानांना देखील शिवरायांच्या पुतळ्यामुळे लढण्याचं बळ मिळेल, असं मुनगंटीवार म्हणाले.

Deola | तालुक्यात कालव्याच्या पाण्यावरून होऊ शकतं ‘तिसरं महायुद्ध’


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here