Entertainment | ‘भाऊंना येत नाय ABCD पण इंग्लिश बोलायला तयार करतात गावची पिढी’ अशी पोस्ट टाकत सैराट फेम अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे.’इंटरनॅशनल फालमफोक’ २७ ऑक्टोबरपासून सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.धिरज गुरव यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे.धिओ फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केलेली आहे.तसेच या सिनेमाचं दिग्दर्शन धिरज गुरव यांनी केलेले आहे.हा सिनेमाचे संवाद- पटकथा-कथा साळुंखे यांनी लिहलेले आहेत.
या सिनेमात तानाजी गालगुंडे आणि सुरेश विश्वकर्मा यांनी अभिनय केलेला.या सिनेमाचं संगीत ऋषी यांनी केलेलं आहे.या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी राहुल लोखंडे यांनी केलेलं आहे.श्रीकांत पिसे आणि लक्ष्मण धोत्रे यांनी कलादिग्दर्शन केलेलं आहे.(Entertainment)
Navratri-पोलिसांनी घेतला मोठा निर्णय;नवरात्रोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी
सुरेश रामसिंग विश्वकर्मा हे मराठी चित्रपट अभिनेते आहेत. यांनी सैराट या चिञपटातील तात्यासाहेब ही भूमिका विशेष गाजली आहे.यांचं शिक्षण प्राथमिक- जि.प.प्रा.शाळा.कडा कारखाना तालुका आष्टी. माध्यमिक-जयभवानी विद्यालय, जळगांव(कडा कारखाना)ला झालेलं आहे. त्यांनी पहिला अभिनय-जयभवानी विद्यालयात आठवीला शिक्षण घेत असताना श्रीरंग बोराडे लिखित-दिग्दर्शित ‛अंधार अंधार चोहीकडे अंधार’ ही एकांकिका केली.त्यात त्यांनी ‛राजा’ची भुमिका केली.सर्वांनी त्या भूमिकेमुळे खुप कौतुक केले.अभ्यासात त्यांचे मन रमत नव्हते.त्यांना सतत अभिनय करावा असे वाटायचे. त्याच कोवळ्या वयात त्यांनी निर्णय घेतला कि मोठं होऊन मला अभिनेताच व्हायचे आणि त्या निर्णयापासुन आजपर्यंत यत्किंचितही डळमळीत झाले नाही व कुटुंबीयांनी त्यांना कधीच माझा विरोध केला नाही.सैराट-आणि याच दरम्यान नागराज मंजुळेंचा फोन आला..भेटलो.सैराट बद्दल चर्चा झाली आणि मी तात्यासाहेब पाटील झालो…शुटिंग दरम्यान खुप चांगल्या गोष्टी अनुभवायला, शिकायला मिळाल्या.आज नागराजजींच्या एखाद्या सिनेमात उभं असणं किंवा त्या सिनेमाचा टेक्नीकली भाग असणं कलाकारांसाठी पर्वणी समजली जाते..तिथे त्यांच्या फँड्री व सैराट अशा दोन सिनेमात मी आहे..हि नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.सध्या सैराटने संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय.‛कुणाच्या बुडाखाली किती अंधाराय’..हा माझा डायलॉग गाजतोय.. आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालंय.मज्जा येतेय..पण जबाबदारीही वाढली आहे..आठवीला केलेल्या ‛अंधार अंधार चोहीकडे अंधार’ एकांकिकेपासुन सुरू केलेला प्रवास ‛सैराट’ पर्यंत येऊन पोहचलाय..आता खऱ्या अर्थानं प्रवासाला सुरुवात झालीये..असं अभिनेते सुरेश रामसिंग विश्वकर्मा म्हणतात.
Shivrayancha Chhava | ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाबद्दल मुख्यमंत्र्यांची पोस्ट
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम