Mumbai : आमदार अनिल परब यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर त्या मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल

0
25

Mumbai : शिवसेना गटाचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियरला मारहाण करण्यात आली होती. हे प्रकरण आता त्यांना चांगलंच अंगलट आल्याचं बघायला मिळत आहे. याप्रकरणी मुंबईच्या वाकोला पोलिसांनी शिवसेना गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख अनिल परब आणि 20 ते 25 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी हात गुन्हा दाखल केला आहे. बृहन्मुंबई महापालिकेने वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या एका शाखेवर काल बुलडोजर चालवले आणि ही कारवाई करताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही शाखा अनधिकृत असल्याचं सांगितलं होतं. मातोश्रीपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही शाखा होती. अशा प्रकारच्या कारवाया करून सरकार जाणून बसून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मनपा कार्यालयातील एका अभियंत्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण ही केली होती.

 

दरम्यान याच प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 13 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून काही जण फरार आहेत. फरार कार्यकर्त्यांना शोधण्यासाठी वाकोला पोलिसांनी वेगवेगळ्या टीम्स बनवून त्यांची धरपकड सुरू केली आहे. तर माजी नगरसेवक सदा परब, हाजी हलीम खान, शाखाप्रमुख संतोष कदम, शाखाप्रमुख उदय दळवी यांना अटक केली आहे. दरम्यान चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या काही जणांना सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर सोडण्यात आल आहे. मात्र यामुळे आता राज्यातील वातावरण अजून जास्त तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here