Election Commission | अखेर विरोधकांच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली

0
76
#image_title

Election Commission | केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी मोठा निर्णय घेतला असून राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना राज्याच्या पोलिस महासंचालक या पदावरून हटवण्याचे वृत्त आता समोर आले आहे.

Election Commission: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह 5 राज्यांतील निवडणूक जाहीर, भाजपा कॉँग्रेसचा कस लागणार

पोलीस महासंचालक पदाचा पदभार वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवणार

काँग्रेस व इतर पक्षांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पोलीस महासंचालक शुक्ला यांची तात्काळ बदली करण्यात आली असून पोलीस महासंचालकांचा पुढील पदभार सर्वात वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. याकरिता राज्याच्या मुख्य सचिवांना उद्या दि. 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत 3 आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनल पाठवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.

Nashik Political | नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात युती, आघाडीला मनसेचे तगडे आव्हान

आयुक्तांकडून पक्षपातीपणा करू नये असा इशारा 

तसेच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता यावेळी आढावा बैठका घेण्यात आल्या. दरम्यान काँग्रेस अनेक विरोधी पक्षांकडून पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेवेळी अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्षपणे त्यांचे कर्तव्य पार पाडावे, पक्षपातीपणा करू नये. असा इशारा देखील आयुक्तांनी दिला होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here