द पॉईंट नाऊ ब्युरो : आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यात दीड वाजेपर्यंत जवळपास 278 आमदारांनी मतदान केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज होत असलेल्या राज्यसभा निवडणूक मतदानाकडे सर्वांचे डोळे लागून राहिलेले आहेत. या मतदानाचा निकाल आज सायंकाळी 7 वाजता लागणार आहे.
महाविकास आघाडी आणि भाजप हे आमनेसामने आहेत. दोन्हीही पक्षांनी कंबर कसून, निवडणूक तेच जिंकणार म्हणून विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता काय ते चित्र सायंकाळी निकालानंतरच स्पष्ट होईल.
AIMIM पक्षाने महाविकास आघाडीस मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार हे भाजपलाच मतदान करणार असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपल्या मतदानाचा कोटा वाढवण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे टेंशन वाढले होते. तर महाविकास आघाडीचे दोन मत बाद करण्याची मागणी भाजपने केली होती. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली. यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांच्या हाती आणि जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्या हाती मतपत्रिका दिल्याने, भाजपने ही दोन मते बाद करण्याची मागणी केली होती.
आजचे मतदान हे 4 वाजेपर्यंत चालणार आहे. आता या मतदानात नेमके कोण बाजी मारते? महाविकास आघाडी की भाजप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीआधी दोन्हीही गटांचे एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप सुरू होते. त्यामुळे आता यांमधून कोणाला काय साध्य होते. हे सायंकाळीच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम