Eknath Shinde | मी मेहनती, प्रामाणिक आणि कष्टाळू आहे; माझ्यावर मोदींची जादू

0
31
Lok Sabha Election
Lok Sabha Election

Eknath Shinde | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान मोदींच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले असून, त्यांनी त्यांची आणि मोदींची केमिस्ट्री सांगितली आहे. यावेळी ते, समृद्धी महामार्ग, मेट्रो असे अनेक राज्याचे हिताचे आणि विकासासाठीचे प्रकल्प आपण मार्गी लावले असून, राज्यात विकासाची घोडदौड जोरात सुरु असल्याचे सांगितले. तसेच ते म्हणाले की,” महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे की, जिथे विकास प्रकल्प हे इतक्या मोठ्या प्रमाणात राबवले जातात, असेही ते म्हणाले.

Eknath Shinde | माझ्यावर मोदींची जादू

दरम्यान, यावेळी तीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुक सुमनांची उधळण केली असून, ते म्हणाले की,आम्ही महिला सक्षमीकरणाचा निर्णय घेतला त्याचा राज्यातील महिलांना मोठा फायदा झाला. राज्यात विकास होत नाही, असं नाही, त्या विकासाचा लाभ घेता येत नाही. माझ्यावर मोदींची जादू चाललेली असून, आता त्यांचीच गॅरंटी देशात चालत आहे. मोदींना प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आवडतो.’ असे ते म्हणाले. (Eknath Shinde)

CM Eknath Shinde | अपघातग्रस्तांसाठी मुख्यमंत्री बनले देवदूत; वाचवले तरुणाचे प्राण

पंतप्रधानांनी माझं कौतुक करणं ही अभिमानाची बाब

पुढे ते म्हणाले की,”मोदींनी आजपर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही. आपले संपूर्ण जीवन त्यांनी आपल्या देशासाठी समर्पित केलं आहे. ते दिवाळी देखील देशाच्या जवानांसोबत साजरी करतात. भारताचं नाव हे आता जगभरात आदराने, घेतले जाते. कित्येक राष्ट्राचे प्रमुख, कित्येक देशांचे राष्ट्राध्यक्ष, आणि पंतप्रधान हे मोदींना सलाम करतात. कुणी त्यांना ‘बॉस’ म्हणतो, तर कुणी त्यांना नमस्कार करतो’, हे अधोरेखित करत त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. (Eknath Shinde)

मी मेहनती, प्रामाणिक आणि कष्टाळू आहे 

यावेळी पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की,”मी मेहनती, प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. तसेच मी राज्याचा मुख्यमंत्री असलो, तरीही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करत असतो. मी स्वतः लोकांना भेटतो, त्यांच्याशी संवाद साधतो. कुठे दुर्घटना वगैरे काही झाली असली तर मी स्वतः तिथे जाऊन सर्व यंत्रणा कामाला लावतो. यामुळे त्यांना लवकर मदत होते व त्यांचा जीवही वाचतो, हे शेवटी मेहनतीचं काम आहे. मेहनत, कष्ट व एकनाथ शिंदे हे एक समीकरण आहे. आणि देशाच्या पंतप्रधानांनी माझं कौतुक करणं ही अभिमानाची बाब असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Eknath Shinde)

CM Eknath Shinde | विरोधी पक्षांचे अवसान गळाले; मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच घेरले

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचं व्हिजन..?

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांत पाणी कसे नेता येईल, यासाठी आम्ही निर्णय घेतले. ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ बंद करण्यात आला होता, तो आम्ही पुन्हा सुरु केला. ‘जलयुक्त शिवार योजना’ बंद करण्यात आली होती. तीदेखील आम्ही पुन्हा सुरू केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात कसे बदल होतील, यासाठी आम्ही प्रयत्न केले. आज तुम्हाला मी सांगतो, गेल्या अडीच वर्षाच्या पूर्वी आणि आमच्या दीड वर्षाच्या काळात १२० सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिलेली आहे. १२ लाख हेक्टर इतकी जमीन सिंचनाखाली आणली जाणार आहे, हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा असणार असल्याचीही घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. (Eknath Shinde)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here