मुंबई : यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा विशेष ठरणार आहे. कारण यंदा शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर प्रथमच दोन वेगवेगळ्या गटाकडून वेगवेगळ्या मैदानांवर हा दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यासाठी ठाकरे गट व शिंदे गट ह्या दोनही गटांकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर नुकताच समोर आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा टीझर आपल्या ट्वीटर अकाउंटवर #दसरा_मेळावा_२०२२ असा हॅशटॅग वापरत ट्वीट केला आहे. सदर व्हिडीयोत छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे दिसत आहेत. विशेष म्हणजे, ह्या व्हिडियोमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरण्यात आला आहे. ज्यात बाळासाहेब म्हणतात, “हा शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत फडकावत असला पाहिजे”. तर व्हिडीयोतील कॅप्शनमध्ये “एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ… हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार” असे लिहित मोठ्या संख्येने दसरा मेळाव्याला येण्याचे आवाहन शिंदेंनी केले आहे. तसेच ह्या मेळाव्याचा उल्लेख “शिवसेनेचा दसरा मेळावा” असा करण्यात आला आहे.
#दसरा_मेळावा_२०२२ pic.twitter.com/mCQZs6rufq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 29, 2022
दरम्यान, शिंदे गटाकडून बीकेसी मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु असून ठिकठिकाणी ह्या मेळाव्याचे पोस्टर्स लावले जात आहे. तसेच, शिंदेनी कार्यकर्त्यांसाठी विशेष बस सोडण्यात येणार असल्याचीही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी सर्वाना मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम