माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. जळगाव येथील रुग्णालयात एकनाथ खडसे यांना दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मनोज जरांगे पाटील पुन्हा करणार राज्याचा दौरा; जरांगेंचा मेगा प्लॅन आला समोर
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मुंबईला हलविण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, तातडीने उपचार करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला असता मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. त्यांनी प्रशासनाला एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचा सूचना दिलेल्या आहे. काही वेळातच एकनाथ खडसे यांना मुंबईत आणण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम