Eknath Khadse | नाथाभाऊंची राजकारणातून निवृत्ती..?; केली मोठी घोषणा

0
56
Eknath Khadse
Eknath Khadse

Eknath Khadse | राज्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यातच आता एकनाथ खडसे यांनी मोठी घोषणा केली असून, यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसून, आता मला कोणतीही निवडणूक लढवण्याची इच्छाच नसल्याची मोठी घोषणा एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. मात्र, असे असले तरी मी राजकीय निवृत्ती घेतली नाही, असे म्हणत त्यांनी सगळ्यांनाच संभ्रमातही टाकले आहे.

तसेच भाजप (BJP) प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले की,” माझा भाजप प्रवेश होईल हे स्वतः तावडे यांनी सांगितल्यामुळे मी निश्चिंत आहे. आता माझ्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन (Girish Mahajan), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या तिघांचाही काहीही विरोध नाही. मुळात त्यांचा हा विरोध कधीही नव्हताच, ते त्यांचे केवळ नाराजीचे सूर असून, त्यांची नाराजी आता दूर झालेली आहे, असं त्यांनी स्पष्टच सांगितले.

Eknath Khadse | भाजप प्रवेशाबाबत – 

भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट सांगितले आहे की, नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होईल. त्यामुळे आता मी त्याबाबत निश्चिंत असून, मी भाजप प्रवेश करणार याबाबत काहींची नाराजी होतीच. सर्वच गुणगान करतील असे काही होत नाही. तर, काही लोक दुखावलेजी जातात. जे नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचे महजे प्रयत्न आहेत.

Eknath Khadse | सुनबाईंसाठी एकनाथ खडसे प्रचाराच्या मैदानात

‘त्या’ तिघांचा विरोध..?

एकदा भाजपमध्ये आल्यानंतर मला व गिरीश महाजन आम्हा दोघांना एकत्र काम करावेच लागणार आहे. भाजप पक्षाच्या हितासाठी काम करण्याचा आम्ही दोघे मिळून निर्णय घेऊ. तसेच पक्ष प्रवेशावर गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस या तिघांचा आता विरोध नाही, त्यांचा विरोध कधीही नव्हता. ते केवळ त्यांचे नाराजीचे सूर होते.

यापुढे निवडणूक लढवणार नाही 

तसेच यावेळी बोलताना खडसे म्हणाले की,”मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. मला आता कुठलीही निवडणूक लढविण्याची इच्छाच नाही. मी ही पाच वर्षे अजून विधान परिषदेचा आमदार असून, शरद पवारांनी देखील सांगितले आहे की, आम्ही एकदा दिलेली वस्तू परत घेत नाही. त्यामुळे एकप्रकारे मला शरद पवारांनी अभय दिले. यानंतरही काही लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील तर मला त्यांच्याशी काहीही देणंघेणं नाही.

मी एक राजकीय माणूस असून, मी आता ही काही राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात यापुढे काहीही होऊ शकते. मात्र, आता माझा कोणतीही निवडणूक लढवण्याकडे कल नसून मी राष्ट्रवादी सोडताना शरद पवारांना काय सांगितले..? हे मला काही आता सांगता येणार नाही, त्यामुळे काही गोष्टी या माझ्यासाठी राखीव असू द्या, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

Eknath Khadse | ‘या’ तीन नेत्यांमुळे रखडला नाथाभाऊंचा भाजप प्रवेश..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here