Education News | आता शालेय अभ्यासक्रमात ‘या’ नव्या विषयाचा समावेश

0
24
Education News
Education News

Education News |  राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. यानुसार आता शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासूनच ‘कृषी’ ह्या नवीन विषयाचा समावेश होणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसारकर हे दापोलीमध्ये बोलत होते.(Education News)

दरम्यान, दीपक केसरकर यांनी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाला काही कामानिमित्त भेट दिली असताना, त्यावेळी मीडियासोबत बोलताना त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. भविष्यात राज्यात कृषी ह्या घटकाशी शिक्षणाची गरज बघता, इयत्ता पहिलीपासूनच्या शालेय शिक्षणातच आता विद्यार्थ्यांना ‘कृषी’ विषयाचे धडे मिळणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री केसरकर यांनी केली आहे.

LPG Rate | सरकारने दिलेय महिलांना हे ‘न्यू इयर गिफ्ट’

काय म्हणाले केसरकर? |(Education News)

दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाला भेट दिल्यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसारकर हे माध्यमांसोबत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “भविष्यातील कृषी विषयक शिक्षणाची गरज बघता आता शालेय शिक्षणातच इयत्ता पहिलीपासूनच कृषी हा विषय देखील शिकवला जाणार आहे.(Education News)

आपण म्हणत असतो की ह्या आधुनिकतेच्या काळात निसर्गाची सध्या मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे मुलांमध्ये जर निसर्गाची आवड निर्माण करावयाची असेल तर कृषीला पर्याय नाही. म्हणूनच आता इयत्ता पहिलीपासूनच कृषी हा विषय बंधनकारक करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.

Nashik News | नागपुरच्या निकालानंतर नाशकातील ‘या’ 29 दिग्गजांचे दणाणले धाबे

दरम्यान, यावेळी पुढे बोलताना ते म्हटले की, कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार करण्यात आलेला आहे. यंदाच्या ह्या चालू वर्षापासूनच इयत्ता पहिलीपासून कृषी विषयाचे शिक्षण सुरू करण्याचा मानस असून, त्यासाठी शिक्षकांना देखील यासंबंधीचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.(Education News)

कारण बऱ्याच शिक्षकांनी कृषीचे शिक्षण घेतलेले नसतं, कोणी ‘बीएस्सी – बीएड’ केलं आहे, कोणी ‘बीए – बीएड’ केलेलं आहे. तर कोणी ‘एचएससी – डीएड’ चं शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे आता आधी शिक्षकांनाच कृषीचं ट्रेनिंग देण्यात येणार असल्याचं यावेळी दीपक केसरकर यांनी सांगितले आहे(Education News).


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here