Skip to content

इ पिक पहाणीची अट रद्द करा ;राज्य कांदा उत्पादक संघटना


देवळा : इ पिक पहाणीची अट रद्द करून,स्वयम घोषणा पत्राद्वारे, कांद्याला सरसकट घोषीत केलेले अनुदान देण्यात यावे ,या मागणीचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की , शासनाने कांदा उत्पादकांना 350/रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले आहे.

इ पिक पहाणीची अट रद्द करून कांद्याला सरसकट अनुदान देण्यात यावे ,या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देतांना जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, कुबेर जाधव, कृष्णा जाधव आदी (छाया – सोमनाथ जगताप)

त्यासाठी सातबारा उताऱ्यावर ई पिक पहाणीची अट घातली आहे, सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ती केलेली नाही एकर, दोन एकर क्षेत्रावर लागवड करताना अल्प भूधारक शेतकरी, गोरगरीब आदिवासी समाजबांधवा कडे तशी ई पिक पहाणीची नोंद करण्यासाठी महागडी आँनलाईन मोबाईल यंत्रणाच अस्तित्वात नाही , ते कसं काय ई पिक पहाणीची नोंद करनार ?असा प्रश्न राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विचारला जात आहे, बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे तशी नोंदही नाही, त्यांनी काय करायचे ?, त्यांना जर सरकारच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव, संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास कोकरे यांनी निवेदनाद्वारे केला आहे .

दुसरीकडे एकत्रित शेती करणाऱ्या करणाऱ्या उत्तपादक शेतकऱ्यांसाठी , सद्या प्रायोगिक तत्त्वावर जरी ई पिक पहाणीची नोंद करण्यासाठी पावले उचलली जात असली तरी तिन चार महिन्यांपूर्वी तशी नोंद झालेली नाही ही वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे, त्यासाठी सक्तीची अट शिथिल करून,ज्या शेतकऱ्यांनी कांदा बाजार समित्यांमध्ये विकला आहे, त्यांच्या कडुन स्वयम् घोषणा पत्र लिहून अशा सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, संभाव्य बोगस नोंद करुन भ्रष्टाचार बोकाळनार नाही याची काळजी व दखल सर्वच बाजार समित्यां,पणन व इतर शासकीय यंत्रणांनी घेणं जरुरी चे आहे, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने घेतली आहे, अनुदानापासून कोण्हीही वंचित राहू नये अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने, संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केली आहे.

्गेल्या तिन चार दिवसांपासून कसमादे मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट मुळे कांद्यासह इतर शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आहे , शेतात काढून पडलेला रब्बी कांदा, गहु या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .शासनाने तात्काळ सरसकट पंचणामे करुन आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी ही मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री ना दादा भुसे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!