शहरातील मुस्लीमबांधवांनी एकत्र येत वडाळागावात काढली अमलीपदार्थ विरोधी जनजागृती रॅली

0
33

नाशिक : शहरात जे कोणी मुस्लीम बांधव अमली पदार्थ विक्री करत असतील, त्यांनी वेळीच आपला हा ‘हराम’ व्यवसाय न थांबविल्यास हा समाज त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा मुस्लीम धर्मगुरू मौलाना जुनैद आलम यांनी दिला आहे.

आगामी ‘ईद ए मिलाद’च्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लीम धर्मगुरूंनी एकत्र येत यावर्षी ‘नशामुक्त नाशिक’ हे अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत आज शहरातील वडाळागावातून अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. खतिब ए शहर हाफीज हिसामोद्दीन खतिब व जामा गौसिया मशिदीचे मुख्य मौलवी जुनेद आलम यांनी ह्या रॅलीचे नेतृत्व केले. यावेळी रॅलीत सर्व मुस्लिम समाजातील युवक, जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. जामा गौसिया मशिदीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ह्या रॅलीला सुरूवात झाली. ती शंभर फुटी रोडमार्गे येत झीनत नगर येथील कब्रस्तानाजवळ रॅलीची सांगता करण्यात आली.

यावेळी धर्मगुरूंनी नाशिक शहर व जिल्ह्यात विविध अमली पदार्थांची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. त्याविरोधात हे अभियान सुरू करण्यात आले असून सर्व मुस्लीम धर्मगुरूंनी ह्या समाजाला जागरूक करत नाशिकसह महाराष्ट्र नशामुक्तीसाठी लढा दिला जात आहे. यासाठी सर्वांनी एकजूट होत युवकांना सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी केले आहे.

यावेळी शहर ए खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी, मौलाना जुनेद आलम, राजू देसले, इस्माईल पहलवान यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास वांजळे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. रॅलीनंतर खतिब ए शहर यांनी दुआ पठण करत नशामुक्तीसाठी विशेष दुआ केली. यावेळी अजमल खान, युसुफ जकानी, मुख्तार शेख व असंख्य मुस्लीम बांधव उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here