महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यावरील अल्टिमेट मुद्दा उपस्थित करत राज्यातील वातावरण ढवळून टाकले आहे. सर्वत्र तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने राज्यात 4 मे रोजी परराज्यातील लोक येऊन कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असे रिपोर्ट गृह विभागाला मिळाले आहेत
या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दक्ष झालं आहे. यातील परिस्थितीबाबत एकूणच चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली. डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांनी मध्ये कोण द्वारे चर्चा झाली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर आज गृहमंत्रालयाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असे स्पष्ट निर्देष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले आहेत. आज मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्यात फोन वरून चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं पोलिसांना कारवाईसाठी आता कुठल्याही प्रकारचा दबाव नसेल हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि पोलीस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्रतेनं पहायला मिळू शकतो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम