Divorce Case | आजकालच्या त्रस्त जीवन शैलीमुळे आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर होत असतो. दरम्यान, यामुळे अनेकवेळा याचे परिणाम हे वैवाहिक आयुष्यावरही होत असतात. यामुळे अगदी लहान कारणावरूनही गोष्टी ह्या घटस्फोटापर्यंत जातात. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. (Divorce Case)
अनेकवेळा घटस्फोट घेण्यासाठी आलेली जोडपी ही मुळणासाठी किंवा आर्थिक बाबींसाठी भांडत असतात. पण, पुण्यातील हे प्रकरण अतिशय आगळेवेगळे आणि हास्यास्पद आहे.
दरम्यान, या घटनेत ह्या जोडप्याने दोघांच्या संमतीने त्यांच्या नात्यात घटस्फोट घेतला असून, हे जोडपं एका पोपटासाठी भांडत होते. त्यामुळे या प्रकरणी काही काळ घटस्फोट हा पोपटामुळे रखडला होता. पुणे शहरात एका आफ्रिकन पोपटामुळे एका जोडप्याचा घटस्फोट हा रखडलेला होता. दरम्यान, हा आफ्रिकन पोपट दिल्यानंतरच हे दाम्पत्य विभक्त झाले आहेत. (Divorce Case)
Toll Update | वाहनधारकांसाठी गुड न्यूज! आता वाहनं न थांबता केली जाणार स्वयंचलित टोल वसुली
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, ह्या प्रकरणी पतीने आपल्या पत्नीला यांच्या लग्नाच्या आधी ‘आफ्रिकन ग्रे’ ह्या प्रजातीचा पोपट भेट म्हणून दिलेला होता. आणि यांच्या लग्नानंतर लगेचच काही वर्षांत ह्या दोघांमध्ये वाद निर्माण झाले. अनेक दिवसांपासून ह्या दोघांचे एकमेकांसोबत पटत नव्हते. त्यामुळे ह्या दाम्पत्याने विभक्त होण्यासाठी म्हणजेच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला होता.(Divorce Case)
दारम्यान, सन २०१९ मध्ये पुणे शहरातीलच एका रजिस्ट्रार कार्यालयात ह्या दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. पण पुढे लग्नाच्या तब्बल दोन वर्षांतच ह्या दोघांमध्ये काही कारणांवरून मतभेद होऊ लागले. तसेच, ह्या मतभेदांचे रूपांतर हे नंतर वादात झाले. दरम्यान, ह्या रोजच्या भंडणांना कंटाळून अखेर ह्या जोडप्याने घटस्फोट घेण्यासाठी सन २०२२ डिसेंबर मध्ये घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला होता. आणि यानंतर हे प्रकरण पुढे समुपदेशनासाठी पाठिवले होते. दरम्यान, त्यावेळी एक हास्यास्पद माहिती समोर आली.
Gold News | महिलांनो! जास्त सोने खरेदी करू नका अन्यथा…
पोपट नाही तर, घटस्फोट नाही…
या प्रकरणी, समुपदेशना नंतरही हे दाम्पत्य एकमेकांसोबत पुढे राहण्यास इच्छुक नसल्याच्या निर्णयावर ठाम असल्याने, घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्तब झाले. हे दोघेही यासाठी पूर्ण तयारीत होते. तसेच यापैकी पत्नीने कुठल्याही प्रकारच्या पोटगीची मागणी देखील केली नसल्याने ह्या दोघांच्याही पूर्ण संमतीने हा घटस्फोट होणार असतानाच पतीने ‘लग्नाच्या आधी मी भेट दिला होता टो, ‘आफ्रिकन ग्रे’ पोपट परत कर’, अशी मागणी केली आणि ह्या मागणीवर पती अडूनच बसल्याने आणि त्यातच पत्नीदेखील हा पोपट द्यायला तयार नसल्याने यांचे पुन्हा समुपदेशन करण्यात आले. आणि यानंतर पत्नीनेही हा पोपट परत करण्याचे मान्य केले आणि त्यानंतर कुठे हा घटस्फोट झाला. (Divorce Case)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम