द पॉईंट नाऊ ब्युरो : काँग्रेस आणि भाजप हे देशातील कट्टर विरोधी राजकीय पक्ष आहेत. सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे. तर बहुतांश राज्यांमध्ये देखील भाजपचे सरकार आहे. आता उत्तराखंड मध्ये तर भाजपचा उमेदवार निवडून आले. आणि काँग्रेसच्या उमेदवारावर थेट डिपॉझिटच जप्त होण्याची नामुष्की ओढवली.
उत्तराखंड मध्ये नुकतीच चंपावर मतदार संघात पोटनिवडणूक पार पडली. यात भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे तब्बल 50 हजारहुन अधिक मतांनी विजयी झाले. तर काँग्रेसच्या उमेदवाराचे मात्र थेट डिपॉझिटच जप्त झाले. काँग्रेससाठी ही एक प्रकारची नामुष्कीच आहे.
खतीमा मतदारसंघातुन धामी हे निवडणूकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी निवडून येणे आवश्यक होते. या निवडणुकीत धामी यांनी 54 हजार मतांनी विजय मिळवला. तर काँग्रेसच्या उमेदवार निर्मला गहतोडी यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. व त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम