Dindori | दिंडोरीतुन शिंदे गटाचे धनराज महालेंची माघार

0
53
#image_title

वैभव पगार- प्रतिनिधी: दिंडोरी | राज्यात महायुती असून पण शेवटच्या दिवशी हेलिकॉप्टर ने AB फॉर्म मिळालेले शिंदे गटाचे उमेदवार व माजी आमदार धनराज महाले यांनी माघार घेतल्याने दिंडोरीच्या लढतीचे चित्र स्पस्ट झाले आहे.

Dindori | सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या तर्फे करंजी मोलाची उपक्रम

सोशल मीडियावर धनराज महालेंचे पत्रक फिरत असून त्यावर म्हटले आहे की-

“महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 करिता मी दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना पक्षाकडून उमेदवारी करण्यास इच्छुक होतो. पक्षाची उमेदवारी मिळण्याकरिता मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. याकरिता मला सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि त्या प्रयत्नांना शेवटच्या क्षणी यश देखील आले. पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला जनतेच्या विश्वासावर AB फॉर्म पाठवला त्यामुळे निवडणूक अटळ झाली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच पुन्हा विनंती केली की, महायुतीचा धर्म आपल्याला पाळावा लागेल आणि धनराज तू विजयी उमेदवार आहेस पण युतीधर्म पाळण्यासाठी तुला माघार घ्यायला लावतो आहे. याची मला आठवण राहील. साहेबांच्या या विनंतीला मान देऊन दिंडोरी-पेठ विधानसभा निवडणुकीतून पक्ष आदेशानुसार थांबण्याचा निर्णय घेत आहे. इथून पुढील काळात मी शिवसेना पक्षाचे काम करत राहील व पक्षाचे ध्येयधोरण तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी रात्रंदिवस तत्पर राहील.”

-धनराज महाले


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here