वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | म. वि. प्र. संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनियर कॉलेज मोहाडी विद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व डॉ. सर सी. व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.वि. प्र. संचालक प्रवीण नाना जाधव होते.
Dindori | दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या १३ पैकी ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
कार्यक्रमास शालेय समितीच सदस्य व मोहाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी पोलीस स्टेशनचे पी. आय. रघुनाथ शेगर व ए. पी. आय गायत्री जाधव, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष सुरेश सोमवंशी, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष विजय जाधव, अभिनव बालविकास मंदिर शालेय समिती अध्यक्ष रामराव पाटील जाधव, आयटीआयचे अध्यक्ष रवी आप्पा जाधव, निखिल जाधव, अशोक कळमकर, राजेंद्र कळमकर, दीपक जाधव, अभिजीत जाधव, सुदर्शन जाधव, कृष्णाराव जाधव, शिवाजी नाठे, प्रदीप जाधव, शालेय समितीच सदस्य व मोहाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ गडाख यांनी केले.
Dindori | आज नाशकात ‘इतके’ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात
5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी मिळून ७८ वैज्ञानिक उपकरणांची मांडणी केली
यावेळी विद्यालयाचे संगीत शिक्षक दिलीप पागेरे व गीत मंच यांनी विज्ञान गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी काढलेल्या वैज्ञानिक रांगोळ्या व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृती दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळून ७८ वैज्ञानिक उपकरणांची मांडणी केली. यावेळी वैभव पगार व विशाल खुळे यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या उपकरणांची माहिती घेत विविध प्रश्न विचारले तर विद्यार्थ्यांनी प्रश्नांची समर्पक उत्तरे देत आपल्या उपकरणांची माहिती दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम