Dindori | तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्रच्या वतीने बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

0
15
#image_title

वैभव पगार -प्रतिनिधी: दिंडोरी | तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र परळीच्या वतीने २३ फेब्रुवारी २०२५ रोजी बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख साप्ताहिक मानपत्रचे संपादक तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

Dindori | दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे दुख:द निधन

बुधवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी शहर व तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांना कळविण्यात येते की, तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र परळीच्या वतीने दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रविवारी दुपारी ठीक १:३० वाजता परळी शहरातील नटराज रंगमंदिर येथे बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गरीब कुटुंबातील नववधू- स्वरांनी सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेता यावा हा उद्देश

बौद्ध समाजातील लोकांचा अनाठायी खर्च होणे व त्यासाठी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी व समाजातील ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. अशा कुटुंबातील नववधू वरांना या सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेता यावा व सर्व समाजातील लोक एकत्र यावे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून समाजातील जास्तीत जास्त नववधूवरांनी व त्यांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा व २३ जानेवारी २०२५ पर्यंत नाव नोंदणी करण्यात यावी. असे ही आव्हान करण्यात आले आहे. तसेच नाव नोंदणीसाठी रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट फोटो, शंभर रुपयांच्या बॉण्ड वर शपथ पत्र, टीसीची झेरॉक्स असे कागदपत्र घेऊन नाव नोंदणी करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

Dindori | मतदान रुपी भाऊबीजेची भेट देऊन सुनिता ताईंना आमदार करा- प्रवीण नाना जाधव

जास्तीत जास्त बौद्ध धर्मियांनी याचा फायदा घ्यावा

यापूर्वी सदरील विवाह हा 26 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमुळे व निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे सदरील सामूहिक विवाह सोहळा रद्द करण्यात आला. त्यामुळे हा विवाह २३ फेब्रुवारी २०२५ रोजी ठेवण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त बौद्ध धर्मियांनी याचा फायदा घ्यावा असेही आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष साप्ताहिक मानपत्र चे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी के ले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here