सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गेल्या पाच महिन्यात एक लाखांहून अधिक महिलांसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 75 कोटी रुपयांचा लाभ मिळाला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मोठ्या प्रमाणात फिरायला मदत झाली असल्याचे प्रतिपादन महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार डॉ. राहुल आहेर यांनी खर्डे येथील प्रचार सभेत केले.
आमदार निधीतून खर्डे गावात बहुतांश विकास कामे मार्गी लागली आहेत
महायुती प्रणित भाजप, शिवसेना, राष्ठ्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले गट) मित्र पक्षाचे देवळा-चांदवड विधानसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. राहुल आहेर हे शनिवारी दि. १६ रोजी देवळा तालुक्यातील वाखारी जि.प. गटातील खर्डे येथील आयोजित प्रचार सभेत बोलताना, ते पुढे म्हणाले की, “आमदार निधीतून खर्डे गावात बहुतांश विकास कामे मार्गी लागली आहेत. आता नार पार योजनेच्या माध्यमातून पुढील काळात प्रलंबित कोल्हे बारी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा आपला मानस असून यामुळे या परिसरातील पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर जलसंधारनाची कामे हाती घेण्यात येऊन कायमचा दुष्काळ हटविण्यास मदत होणार आहे.”
भविष्यात योजनांच्या माध्यमातून जनतेला सर्वसामान्यांना लाभ मिळणार
“मतदारसंघात 141 कोटी रुपयांचा पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला असून, शेतकरी सन्मान निधीचा वर्षाला 12 हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. त्यावर महायुती सरकारने पुन्हा एकदा सरकार स्थापन झाले तर, तो लाभ 15 हजार रुपयांवर नेण्याचा मानस असल्याचे यावेळी डॉ राहुल आहेर यांनी सांगितले. तसेच बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध करून दिल्याने त्याचा लाभ अनेकांनी घेतला असून, विविध समाजाच्या आर्थिक उन्नती साठी महामंडळाची निर्मिती करण्यात आली असून, भविष्यात त्या योजनांच्या माध्यमातून जनतेला सर्वसामान्याना त्याचा लाभ मिळणार आहे.
सभेवेळी ही मंडळी उपस्थित होती
याप्रसंगी माजी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार, जि.प.चे माजी सभापती अरुण आहेर, प्रमोद पाटील, पुंडलिक महाराज, दत्तू मोरे, निबा निकम, सुरेखा शिंदे, संगीता पवार, माजी सैनिक शिवाजी मोरे, भाऊसाहेब पवार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, महेंद्र हिरे, सरपंच अर्जुन मोहन, उपसरपंच सुनील जाधव, आण्णा पाटील, माजी सरपंच जगन्नाथ माळी, कारभारी जाधव, अनिल पवार, दिलीप पाटील, राहुल देवरे, हर्षद मोरे, आबा शिंदे, भाऊराव मोरे, रामकृष्ण कुवर, केदा जाधव आदींसह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश कुवर यांनी सूत्रसंचालन केले तर शशिकांत ठाकरे यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम