Deola | गटशिक्षण अधिकारी सतीश बच्छाव यांच्याकडून मतदानास प्रेरीत करणारे गीत सोशल मीडियावर प्रसारित

0
28
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत-जास्त मतदारांनी मतदान करत सजग लोकशाहीचे दर्शन घडवावे यासाठी स्वीपअंतर्गत प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. येथील गटशिक्षण अधिकारी सतीश बच्छाव यांनी मतदान जनजागृतीसाठी ‘मतदानाचा हक्क बजावूया-चला मतदानाला’ असे दृकश्राव्य स्वरूपातील गीत सोशल मीडियावर प्रसारीत केले असून ते अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. विशेष म्हणजे गीतलेखन स्वतः बच्छाव यांनीच केले असून गायनही त्यांनीच केले आहे.

Deola | ‘नार पार योजनेच्या माध्यमातून येत्या काळात प्रलंबित कोल्हे बारी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस’ – राहूल आहेर

राज्यभरातून या गीताला पसंती

गटशिक्षणाधिकारी बच्छाव हे सतत नाविण्यपूर्ण शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणपूरक उपक्रम राबवत शिक्षकांना व समाजाला दिशा देत असतात. सध्या राज्याच्या विधानसभा पंचवार्षिक निवडणूक सुरू असून बरेच मतदार मतदान करण्यास कंटाळा करतात. हे लोकशाहीच्या दृष्टीने अहितकारक असून प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी त्यांनी आपल्या प्रतिभाशक्तीने अत्यंत प्रेरणादायी गीताचे लेखन केले असून सूर, ताल, लय त्यांनीच देत गायन केले आहे. दृश्य स्वरूपात विविध फोटोंचे दर्शन घडवत पार्श्वगायन रुपात हे गीत सादर केल्याने ते अधिक परिणामकारक ठरले आहे. आतापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी या गीताची लिंक उघडत तसेच व्हिडीओ पाहत प्रतिसाद दिला आहे. राज्यभरातून या गीताला पसंती मिळत असून बसस्थानक, ग्रामपंचायत व नगरपालिकांच्या घंटागाड्या तसेच शाळा-महाविद्यालयांच्या जनजागृती फेरी व कार्यक्रमांमधून हे गीत सादर केले जात आहे. यू ट्यूब चॅनेल @bachhavsatishd2279 वर हे गीत उपलब्ध आहे.

प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून गीताचे कौतुक

राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, बोर्ड सचिव मच्छिंद्र कदम, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नितीन बच्छाव, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, शिक्षण तज्ञ सचिन जोशी, गटविकासाधिकारी राजेश कदम, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर आदींसह इतरही अनेक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या प्रेरक गीताबद्दल सतीश बच्छाव यांचे कौतुक करत ते सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Deola | ‘राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप झाले तर आपण समजू शकतो’; लोहोणेर येथील सभेत राहूल आहेरांचे भावोद्गार

“गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांचे मतदान करण्याचे आवाहन करणारे गीत निश्चितच प्रेरणादायी व मतदान करण्यास प्रवृत्त करणारे आहे. वोटोबासह इतरही अनेक उपक्रम राबवत हे गीत आम्ही आमच्या नगरपंचायतीच्या घंटागाडींवर वाजवत जनजागृती करण्यावर भर देत आहोत.” – प्रमोद ढोरजकर, मुख्याधिकारी, नगरपंचायत, देवळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here