Dindori Lok Sabha Election | प्लॅन सक्सेसफूल..?; दिंडोरीत ड्यूप्लिकेट भगरे सरांचीच हवा, लाखाकडे कूच

0
26
Dindori Lok Sabha Result
Dindori Lok Sabha Result

Dindori Lok Sabha Election | दिंडोरी लोकसभा मतदार संघाची संपूर्ण निवडणूक ही कांदा प्रश्नाभोवतीच फिरत असून, कांदा प्रश्नामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. प्रचारादरम्यानही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष स्पष्ट दिसून आला. ही निवडणूक शेतकऱ्यांनीच हातात घेतल्याचे चित्र स्पष्ट होते. (Dindori Lok Sabha Election)

दरम्यान, पहिली फेरी वगळता अन्य सर्व फेऱ्यांमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे आघाडीवर होते. तर, दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या विद्यमान खासदार भारती पवार या होत्या. मात्र, आज या दोन्ही उमेदवारांच्या लीडपेक्षा भलतेच आश्चर्यजनक आणि हास्यास्पद चित्र पाहायला मिळाले. शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावाशी मिळणारे आणि सर ही पदवी असणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराला ज्याचे कधी कोणी नावही ऐकलेले नसेल. अशा अनोळखी अपक्ष उमेदवाराला चक्क ८०,००० मतं मिळाली आहेत.

Baramati Lok Sabha | बारामती शरद पवारांचीच; दादा पत्नीलाही निवडणून आणण्यात अपयशी

Dindori Lok Sabha Election | प्रतिस्पर्धीचा डाव असल्याची कुजबुज

तर, हा प्रतिस्पर्धीचा डाव असल्याची कुजबुज मतदार संघात सुरू असून, या उमेदवाराला तब्बल ८०,००० मतं मिळाली आहेत. तर, लाखांच्या लीडने दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचा विजय झाला असून, भाजपने आपला बालेकिल्ला गमावला आहे. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी हॅटट्रिक केली होती. त्यानंतर नव्याने भाजपमध्ये आलेल्या भारती पवारांनीही हा गड राखला. मात्र, यंदा हा गड राखण्यात भाजपला अपयश आले.(Dindori Lok Sabha Election)

Nashik Lok Sabha Result | नाशिकमध्ये परिवर्तनाचे वारे फिरले; गुलाल राजाभाऊ वाजेंचाच

शेतकऱ्यांनी आपली ताकद आणि नाराजी मतपेटीतून दाखवली

या मतदार संघातील नकारात्मक वातावरण पाहता भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मैदानात उतरवले तर, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हेदेखील येथे तळ ठोकून त्यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र, तरीही हा गड काही भाजपच्या हाती आला नाही. त्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवली असून, शेतकऱ्यांनी निवणुकीपूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बाजी पलटवली आहे. शेतकऱ्यांनी अखेर आपली ताकद आणि नाराजी मतपेटीतून दाखवून दिली आहे. (Dindori Lok Sabha Election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here