chhagan bhujbal | “कोणाचं खाता कोणाचं खाता? म्हणतो, तुझे खातो काय रे ?” तुझ्यासारखं आम्ही सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते आधी समजून घे, आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला.
मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायचा आहे? त्याला आरक्षण काय ते कळेना, आरक्षण गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही, असं भुजबळ यावेळी म्हणाले. अंबडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ. गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदी नेते यावेळी उपस्थित होते.
छगन भुजबळांनी यावेळी जालन्यातील लाठीचार्जवरुन गंभीर आरोपही केले. जरांगेंच्या आंदोलनाच्यावेळी ७० पोलिसांवर हल्ले झाले होते. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. पण सर्वांसमोर चुकीचं चित्र उभं केलं गेलं. होममिनिस्टरच माफी मागू लागला, गुन्हे मागे घेऊ असे म्हणू लागला, त्यामुळे आता पोलिसांचंच मनोबल खचलं, तसंच ओबीसींचे बोर्ड फाडणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेशही भुजबळांनी यावेळी केलेत.
Chhagan Bhujbal | तुझं खातोय का रे…?; भुजबळ जरांगेंविरोधात कडाडले
काय म्हणाले छगन भुजबळ..?
आमची लेकरं..आमची लेकरं..म्हणतो, आमची नाहीये का.
भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला म्हणतो, हो आजही खातो बेसण भाकर कांदा.
तीन लाख ८० हजार विद्यार्थ्यांना १३०० कोटी रुपये वाटण्यात आले.
सारथी मार्फत १७२ कोटी वाटले गेले.
आताही मराठा समाजाला ३०० कोटी मंजूर झाले आहेत.
मराठा विद्यार्थ्यांना जे मिळत ते ओबीसी च्या विद्यार्थ्यांना अजूनही मिळत नाही.
पोलिसांचा लाठीचार्ज सर्वांनी पाहिला पण ७० महिला पोलीस अॅडमिट होते, ते नाही पाहिले.
जरांगे यांनी त्यावेळी सर्व तयारी केली होती.
७० पोलीस काय पाय घसरून पडले होते का? त्यांना कोणी मारलं..?
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवलं पण, यांनी महिला पोलिसांवर दगडफेक केली.
लाठी चार्ज झाल्यावर हे सरदार (मनोज जरांगे) घरात जाऊन बसले होते.
आमचे टोपे साहेब, छोटे साहेब रोहित पवार यांनी त्याला (जरांगे) पहाटे तीन वाजता परत आणून बसवलं.
SP ची चूक आहे ही, त्याने बोलायला हवे होते, माझे पोलीस रस्त्यावर पोहचले होते.
राज्यापुढे खरं चित्रच आलं नाही.
Good News! २०२४ मध्ये long weekends; शनि-रविवारला जोडून ९ सुट्ट्या
कोड नंबर दिले होते-१ नंबर प्रकाश सोळुंके २ नंबर राऊत हॉटेल असे नंबर दिलेले होते.
जयदत्त क्षीरसागर, संदीप सागर यांच्या घरात पेट्रोल बाँब टाकले, त्यांची लेकरं बाळ पण त्यावेळी घरात होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला दुसऱ्यांची घरं जाळायलाच सांगितलंय का?
त्या नवीन नेत्याला सांगायला तीन न्यायमूर्ती गेले होते.
आमक्या आश्रमाचे महाराज आले म्हणून पाणी पितो, आता मी पाणी पिणार नाही.
न्यायमूर्ती त्याला सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे काय?
याद राख माझ्या शेपटावर परत पाय द्यायचा प्रयत्नही करू नको.
जनगणना ही ताबडतोब झालीच पाहिजे.
हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही, प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मिळावे झाले पाहिजे.
आमच्या ओबीसींना प्रमाणपत्र ८-१० वर्ष लागतात, त्यांना मराठा पुढे कुणबी पेनाने लिहून प्रमाणपत्र दिले जाताय.
पंतप्रधानही obc नेते आहेत, पण इकडे महाराष्ट्रात ओबीसींचे शिरकाण होत आहे. ईकडे लक्ष द्या
पुढार्यांना गावबंदी केलीत, महाराष्ट्र तुमच्या सातबारावर लिहून दिला काय रे..?
गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले गेले पाहिजे, सरकार आहे की नाहीये, कायद्याचे राज्य आहे की नाही?
तुम्ही दादागिरी थांबवली नाहीत, तर ओबीसींबरोबर ,मुस्लिम, दलित हे एकत्र आल्यावर बघा.
मी गेली दोन महिने सहन करतोय, कोणाचा द्वेष केला नाही. मी मराठा समाजाचा द्वेष केला नाही. ३५ वर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि आज अजित पवारांसोबत आहे.
पंढरपूरला अजित पवारांनी यायचं नाही?? देव पण तुझा झाला का रे..?
Crime news | डॉक्टरची रिसेप्शनिस्ट पत्नी करायची सर्जरी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम