Dhule | धुळ्यातील साक्री तालुक्यातील निजामपूरपासून जवळ असलेल्या जांभोरे येथील जंगलात एकाच दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण आणि तरुणी आढळले. रंजना रेडू चौरे (१८) आणि विलास भाल्या गांगुर्डे (२५, दोघे रा. पिंपळगाव खुर्द) अशी मृतांची नावे आहेत. मृत रंजना साक्री येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहत होती. ती बारावीला शिकत होती. दोन दिवसापूर्वी ती बेपत्ता झाल्याची माहीती समोर आलेली आहे. त्यावेळी तसेच विलासही गावात नव्हता. साक्री येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह गावी नेण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.(Dhule)
Mumbai | मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत निर्णय
या संपुर्ण घटनेबद्दल मृत रंजनाचे वडील रेडू गणपत चौरे यांनी दिलेल्या माहितीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. हद्दीच्या कारणावरून पोलिसांत घटनेची नोंद झाली नव्हती. तसेच मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी खासगी वाहन बोलवले होते. पोलिस चौकशीचा ससेमीरा टाळण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे २ तास मृतदेह वाहनाच्या प्रतीक्षेत होते. मृत रंजना-विलास यांचे सुमारे ३ वर्षापासून एकमेकांवर प्रेम होते अशी माहिती आता समोर आलेली आहे.
मृत तरुणांची नावे-
मृत विलास गांगुर्डे
मृत रंजना चौरे
Nanded News | नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव सुरुच
आई-दादा मला माफ करा –
विलासजवळ दोन पानांची चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत त्याने आई-दादा मला माफ करा, लवकर जात आहे. तुमची काळजी घ्या, असे लिहिलेले आहे. तसेच लग्नाबद्दल दबाव येत असल्याचा संदेश चिठ्ठीत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम