Dhangar reservation | संपूर्ण राज्यासह जालना जिल्ह्यातील धनगर समाज हा पुन्हा एकदा प्रलंबित मंगण्यांच्या निषेधार्थ आक्रमक होतांना बघायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात धुळे-सोलापूर ह्या महामार्गावरती राज्यातील धनगर समाजाच्या वतीने शनिवारी रात्रीच्या सुमारास टायर जाळून आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी धनगर समाजाच्या वतीने जामखेड फाटा येथे धनगर आंदोलकांनी टायर पेटवून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. इंदापूर येथे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेक या प्रकरणी आक्रमक झालेल्या राज्यातील धनगर समाजाच्या वतीने हा आक्रमक पवित्रा घेण्यात आला.(Dhangar reservation)
Breaking | चांदवडमध्ये सोमवारी शरद पवारांच्या उपस्थितीत ‘रास्ता रोको’
गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक
धनगर नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेल्या ह्या चप्पलफेक प्रकरणी संपूर्ण राज्यभरात धनगर समाज हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. याचेच पडसाद काल रात्रीच्या सुमारास जालन्यात देखील उमटल्याचे दिसत आहे.
जामखेड फाटा येथील धुळे-सोलापूर ह्या महामार्गावरती शनिवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको देखील करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावरच टायर पेटवलीत.
Onion News | भारती पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; शेतकऱ्यांची मागणी
पोलिसांची मध्यस्थी
त्यामुळे जामखेड फाटा येथील धुळे-सोलापूर ह्या महामार्गावर यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या आंदोलनाबाबतची माहिती मिळताच पोलीस येथील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्थी करत वाहनांसाठी संबंधित रस्ता मोकळा करून दिला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम