Dhananjay Munde | भारतात सध्या कोरोनाने पुनः एकदा डोकं वर काढलं आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा जेएन.1 हा सब व्हेरियंटदेखील भारतात दाखल झाला आहे. तसेच ह्या नव्या व्हेरियंटने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकरने देखील आता याबाबत नियमावली लागू करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, यातच आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.Dhananjay Munde
दरम्यान, सध्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या पुणे येथील मॉडर्न कॉलनीतील निवस्थानी विलगीकरण करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या ह्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरु असून, गेल्या चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता, त्यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, सध्या त्यांना पुण्यातील राहत्या घरी विलगीकरणात ठवण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर तिथेच उपचार सुरु आहेत.Dhananjay Munde
Corona News | कोरोनाच्या नव्या व्हेरीऐंटमुळे आवाज जाणार..?
कोरोनाचा पुन्हा उद्रेक
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, ह्या महिन्यात कोरोनाच्या जेएन.1 ह्या सब व्हेरियंट हा दाखल होण्यास सुरुवात झाली असून, ह्याणे आता जगभरात मोठ्या प्रमाणात हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात जेएन.1 च्या रुग्णांमध्ये २६ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. दरम्यान, ह्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. मात्र, ज्याप्रकारे ह्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, ती परिस्थिती बघता जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. Dhananjay Munde
Corona Alert | वाढत्या कोरोनामुळे पुन्हा मास्क वापरण्याचा सल्ला..!
भारतातही रुग्ण संख्या वाढली
गेल्या १५ दिवसांतच देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही मोठ्या वेगाने वाढत आहे. दरम्यान, भारतात आजच्या घडीला सक्रीय असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही ३,७४२ वर पोहोचली आहे. जेएन.1 ह्या नव्या सब व्हेरियंटचेही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ह्या आठवड्यात रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने झाली आहे. दरम्यान, इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. Dhananjay Munde
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम