Devendra Fadnavis | आज नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना फडणविसांनी अनेक गौप्यस्फोट केले. आणि आगामी निवडणुकांची रणनीती देखील सांगितली. यावेळी ह्या बैठकीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या जागोजागी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहेत. पण, त्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे की, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवारांनीच केला असल्याचा मोठा गौप्यस्फोट हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज नागपूर येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला आहे. शरद पवारांना मराठा समाजाला कधीच आरक्षण द्यायचे नव्हते. त्यांनी स्वत:च्या मोठेपणासाठी शरद पवारांनी आणि त्याच्या पक्षाने ह्या दोन्ही मराठा आणि ओबीसी ह्या समाजांना झुंझत ठेवले अशी टीका यावेळी फडणवीस यांनी केली.Devendra Fadnavis
Malegaon News | दादा भुसे यांना मालेगाव मनपा आयुक्त पदी प्रामाणिक अधिकारी नकोय का?
पवारांना फक्त समाजाला झुंझवायचेय
यांचे सरकार असताना सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारले असता. मराठा आरक्षणाशिवाय राज्यात दुसरे प्रश्नच नाहीत का? असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याचे फडणवीस म्हटले. यांच्या मनात असतं तर, त्यांनी मंडल आयोग आले त्यावेळीच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे आरोप यावेळी फडणवीस केले आहेत. कारण, त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. Devendra Fadnavis
ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही | (Devendra Fadnavis)
राज्यात ज्यावेळी भाजपचं सरकर होतं त्यावेळी आपणच मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयातदेखील आपल्या सरकारच्या काळतच टिकलं असंही यावेळी फडणवीस म्हणाले आहेत. तसेच आताही आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहोत. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही ओबीसींवरही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन यावेळी फडणवीसांनी दिले.
Sudhakar Badgujar | बडगुजर यांच्या विरोधात नाशिक शिवसेनेतर्फे जोडे मारो
राहुल गांधींसारखे विरोधक मिळायला भाग्य
आपल्या विरोधी पक्षांना फक्त त्यांच्या परिवाराची चिंता आहे. तेंना फक्त त्यांचे दुकान बंद होऊ नये याची चिंता आहे. त्यामुळे आता आपण बघत आसतो की, ते कश्याप्रकारे रोज भूमिका बदलतात. आपलं भाग्य आहे की, आपल्याला राहुल गांधी यांच्या सारखे विरोधक मिळाले हे आपले भाग्य आहे. राहुल गांधी यांच्यासारखा विरोधक मिळायलाही भाग्य लागतं. अशी खोचक टीका यावेळी बोलताना फडांवईसान्नि केली. राज्यात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि कॉँग्रेससची काय अवस्था झालीय, हे आपल्याला दिसतच आहे. हे आतंकवादयांसोबत नाचतात आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात. यांना लाज वाटत नाही अशी टीकाही यावेळी विरोधकांवर देवेनर फडणवीस यांनी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम