Devendra Fadnavis | मुंबई: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला जनतेने नापसंती दिल्याचे दिसून आले. भाजप नेतृत्वाने देशात ४०० पार चा तर, राज्याच्या नेतृत्वाने ४५ पारची घोषणा केली होती. मात्र, ४५ च्या अर्ध्याही जागा भाजपला घेता आल्या नाहीत. राज्यात कॉंग्रेस १२ जगांनी सर्वात पुढे असून, २८ जागा लढवून ९ जगांवर विजय मिळवत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे एकूणच राज्यातील कौल पाहता भाजप खचलेल्या अवस्थेत असल्याचे दिसत होते. मात्र, आता स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या व्यक्तव्याने याची प्रचितीही आली.
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार..?
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरून पदमुक्त करण्याची मागणी भाजप नेतृत्वाकडे केली आहे. राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा आत्मविश्वास असलेली महायुती लोकसभा निवडणुकीतच तोंडावर पडली असून, राज्यात महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत.
तर, गेल्या निवडणुकीत २३ खासदार निवडून आलेल्या भाजप आता ९ जागांवर आली आहे आणि १ जागा निवणून आलेली कॉंग्रेस सर्वाधिक ११ जागांवर आली आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्रीपद सोडून भाजप (BJP) पक्षासाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
PM Narendra Modi | मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; ‘या’ तारखेला होणार शपथविधी..?
पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली
तर, आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली. त्यानंतर ते म्हटले की, “भाजपमध्ये सगळे निर्णय हा संपूर्ण पक्ष घेतो. त्यामुळे मी पक्षाला विनंती करतो की, मला आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्णवेळ उतरायचे असल्याने मी शीर्षस्थ नेतृत्त्वाला विनंती करणार आहे की, त्यांनी मला आता राज्य सरकारमधून मोकळं करावं. मला माझ्या पक्षासाठी पूर्णवेळ काम करण्याची संधी द्या. जेणेकरुन ज्या काही कमतरता पक्षसंघटनेत राहिल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी मला वेळ मिळेल. यासंदर्भात मी भाजप पक्षाच्या वरिष्ठांना भेटणार असून, मी त्यांच्या सल्ल्यानेच पूढील गोष्टी करेल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis)
नेहरु यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद मोदीजींना
तसेच मी देशातील भाजपच्या व एनडीएच्या घटक पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. देशाच्या जनतेने पंडीत नेहरु यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद मोदीजींना दिला आहे. एनडीएचं सरकार हे देशात येणार. 1962 नंतर पहिल्यांदाच देशात सरकार तिसऱ्यांदा होते आहे. तर, प्रथमच ओदिशामध्ये भाजपचं सरकार होत आहे. (Devendra Fadnavis)
Rajabhau Waje | गोडसेंवर नाराज नेत्यांचा वाजेंना पाठिंबा..?; वाजेंचे सूचक वक्तव्य..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम