देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे आवाहन

0
18

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. अनेक नेते मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान आता भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील खबरदारी घेण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं आहे. “कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी” असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लातूर दौरा अर्धवट

देवेंद्र फडणीस हे काल लातूर दौऱ्यावर होते. लातूरचा दौरा झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांना ताप आल्यामुळं तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते. देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वीही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी फडणवीस यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या परिस्थिती चिंताजनक नसली तरी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा आवर्जून वापर करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here