Devendra Fadnavis | फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद..?; राज्यात भाजपा नेतृत्वात फेरबदल होण्याची शक्यता

0
129
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | राज्यात लोकसभा निवणुकीत भाजपची चांगलीच दमछाक झाली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेला ४०० पारचा नारा हा सपशेल फेल ठरला असून, राज्य नेतृत्व तर ४५ पारच्या अर्ध्यावरही नाही पोहचू शकले. दरम्यान, यामुळे महायुतीच्या गोटात कमालीची अशांतता पसरली असून, कार्यकर्त्यांसह बडे नेते मंडळींनाही चांगलाच धक्का बसल्याचे दिसत आहे. यची प्रचिती आली ती, आजच्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत. आज पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. तर, केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरून पदमुक्त करण्याची विनंती केली. (Devendra Fadnavis)

Devendra Fadnavis | पराभवाने फडणवीस खचले, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार..?

Devendra Fadnavis | फडणवीसांना केंद्रात मंत्रीपदाची संधी..?

दुसरीकडे केंद्रात सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी घडत असून, आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता लवकरच एनडीए सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकते. यातच फडणवीस केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चा असल्याने त्यांनी आज अचानक एवढा मोठा निर्णय जाहीर केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर, राज्यात भाजपा नेतृत्वात फेरबदल होण्याची शक्यता असून, देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली असून, यात किती तथ्य ही चित्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. (Devendra Fadnavis)

PM Narendra Modi | मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; ‘या’ तारखेला होणार शपथविधी..?

फडणवीस कसे होणार मंत्री..?

दरम्यान, लोकसभेची निवडणूक पार पडली असली तरी राज्यसभेवर निवडणून गेल्यास फडणवीस हे केंद्रात मंत्री होऊ शकतात. तर, मंत्री झाल्यानंतरही या प्रक्रियेसाठी संबंधित व्यक्तीकडे ६ महिन्यांचा कालावधी असतो.

यात संधी म्हणजे, शरद पवार गटाकडून मिळालेल्या राज्यसभा खासदारकीचा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिला असून, त्यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त आहे. या जागेसाठी १३ जून ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, २५ जून रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. ४ जुलै २०२८ पर्यंत या जागेचा कार्यकाळ असल्याने अजित पवार गटासोबत तडजोड केल्यास ही जागा भाजपला मिळू शकते आणि फडणवीस राज्यसभेवर निवडणून जात केंद्रात मंत्री होऊ शकतात.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here