Devendra Fadanvis | विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. सत्ताधारी व विरोधकांमध्ये टिका, आरोप-प्रत्यारोपांच युद्ध सुरूच आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर गंभीर आरोप करत तोफ डागली आहे. धर्माचा वापर करून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस व्होट जिहाद करत आहेत, निवडणुकीच्या काळात इतके लांगुलचालन मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी विरोधी पक्ष काम करत असेल तर त्या विरुद्ध सर्वांना एक व्हावं लागेल.” असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
Devendra Fadnavis | दादांना आमचा गुण लागलाय, युतीचा चेहरा कोण..?; फडणवीसांचं मोठं वक्तव्य
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नागपूर येथील प्रचार सभेत त्यांनी महाविकास आघाडीवरती जोरदार निशाणा साधला असून लोकसभा निवडणुकीसारखाच विधानसभेतही मुस्लिम मतदारांना प्रभावित करून व्होट जिहाद करण्यात येत असल्याचा घणाघती आरोप त्यांच्याकडून यावेळी करण्यात आला. दंगलीतील आरोपी मुस्लिम असून देखील त्यांच्यावरील केसेस परत घेतल्या जातात. मात्र आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येते. व्होट जिहादचे प्रमुख शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे व नाना पटोले आहेत. त्यामुळे बहुसंख्य मतांना पुनर्विचार करून, एक व्हावे लागेलं असं म्हटले आहे. याहून भयानक म्हणजे, नोमानीचा दुसरा व्हिडिओ आला, ज्यात काही लोकांनी लोकसभेत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान केले. त्यांना शोधून काढा व त्यांचे दाणा पाणी बंद करा त्यांना सोशल बॉयकॉट करा.” असे सांगितले जात आहे.
Devendra Fadnavis | बांग्लादेशसारखी स्थिती इथे कोणाचा बाप तयार करू शकत नाही; फडणवीसांनी ललकारले
जातिवादावरून साधला निशाणा
“आपल्याला सेक्युलर म्हणून घेणारे महाविकास आघाडीचे नेते एक शब्दही बोलणार नाहीत. हे एक्स्ट्रीम पोलरायझेशन महाविकास आघाडी करत आहे. त्याला निश्चितपणे उत्तर देऊ. सोशल वर्क करणे हा गुन्हा असून किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात इलेक्शन कमिशनला तक्रार दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, “एक रहावं लागेल. एक आहे तो सेफ आह”, म्हटले होते. आज काँग्रेस जाती-जातीत विभाजित करण्याचा प्रयत्न करत असून दुसरीकडे महाविकास आघाडीने काँग्रेस मुस्लिम समाजाचे एक्स्ट्रीम पोलरायझेशन करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही. ते विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे साधा रोड मॅप नाही. फक्त जातिवाद करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम