Deola | देवळ्यात सालाबादप्रमाणे कावड यात्रा संपन्न; केदा आहेर यांना राखी बांधून महिलांनी मानले आभार

0
35
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते देवळा येथील संगमेश्वर महादेव मंदिरात पायी कावड यात्रेद्वारे युवकांकडून आणलेल्या जलाशयाचा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी रक्षाबंधनाचे औचित्य साधून उपस्थित शेकडो शिवभक्त माता भगिनींचा भाजपचे नेते केदा आहेर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. देवळा येथील १८ युवकांनी त्रंबकेश्वर ते देवळा पायी कावड यात्रेद्वारे शिव तीर्थ आणून येथील संगमेश्वर महादेव मंदिरात शेकडो शिवभक्तांच्या उपस्थित महादेवाच्या पिंडीवर तीर्थ अर्पण करत अभिषेक केला.

Deola | लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान

यावेळी आलेल्या महिला शिवभक्तांच्या हस्ते महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र विकास निधीतून ३५ लाख रुपये निधी मिळवून देणाऱ्या भाजपचे नेते केदा आहेर यांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून कृतज्ञता म्हणून राखी बांधून साजरा केला. आहेर यांनी महिलांना घरघुती वापराच्या वस्तू भेट देऊन सन्मान केला. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी दरवर्षी देवळा शहरातील शिवभक्त युवक त्रंबकेश्वर पायी कावड यात्रेचे आयोजन करतात व देवळा शहरातुन मिरवणुकीद्वारे त्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते.

Deola | केदा आहेर यांच्या मध्यस्थीने माजी सैनिक प्रविण बोरसे यांचे आमरण उपोषण मागे

कोलती व भावडी नदीच्या संगमावर वसलेल्या महादेव मंदिरात तीर्थ अर्पण करून त्याचा समारोप केला जातो. कावड यात्रेत दत्तात्रेय आहेर, राजेश आहेर, पवन आहिरराव, विशाल निकम, सुधाकर आहेर, नरेंद्र भदाणे, सतीश देवरे, अरुण खरोटे, योगेश शेवाळे, विजय आहेर, सोमनाथ वराडे, संदीप आहेर, साहेबराव भामरे, मोहिद्दीन पठाण, सुनील देवरे आदी युवकांनी सहभाग घेतला होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here