Deola | लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान

0
13
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देवळा तालुक्यात २९ हजार महिला भगिनींचे अर्ज नोंदणी झाले असून १९ हजार महिलांच्या बँकखात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे. यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांनी मोलाची भूमिका बजावली व शेवटच्या घटकापर्यंत शासनाची योजना पोहोचविण्याचे काम केले. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचा सन्मान आमदार डॉ.राहुल आहेर, नाफेडचे संचालक व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आला.

तालुक्यातील उर्वरित महिलांना पुढील आठवड्यात लाभ मिळणार – आमदार डॉ.आहेर

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी भरत वेन्दे यांनी केले. यावेळी बोलताना आमदार डॉ.आहेर म्हणाले की,
“देवळा तालुक्यातील महिला भगिनींना आत्तापर्यंत पाच कोटी सत्तर लाख रुपयाचा लाभ मिळाला असून उर्वरित अर्ज दाखल केलेल्या दहा हजार महिलांनाही पुढील आठवड्यात लाभ मिळणार आहे. तर, सप्टेंबर महिन्यात उर्वरित भगिनींना जुलै ऑगस्ट व सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांचा संपूर्ण लाभ मिळणार आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.

Deola | लाडकी बहीण योजनेचा महिलांनी लाभ घ्या; विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका – आ. आहेर

योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या आशा सेविका सन्मानास पात्र – केदा आहेर 

नाफेडचे संचालक केदा आहेर म्हणाले की, “अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांनी रात्रपहाट करून महिलांची अर्ज नोंदणी केली. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावेळी असे वाटत होते की, आपल्या तालुक्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही, अशी साशंकता होती. परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करत कमी कालावधीत दिलेल्या उद्दिष्टपेक्षा जास्तीची नोंदणी केली म्हणून त्या सन्मानास पात्र आहेत”.

यावेळी नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी सांगितले की, “याबाबत दखल घेत येत्या २७ ऑगस्ट रोजी केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त या सक्रिय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान पुन्हा एकदा विविध स्पर्धा व खेळांच्या माध्यमातून बक्षिसरुपी व वैयक्तिक सन्मान करत करण्यात येईल”. यावेळी मंदाकिनी आहेर, शोभा जाधव, लिला शेळके, भिकुबाई सोनवणे या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनीही आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. उपस्थित महिलांनी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावरील मान्यवरांना राखी बांधत याबाबतची कृतज्ञता व्यक्त केली.

Deola | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा – आ. डॉ. राहुल आहेर

या सन्मान सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक जितेंद्र आहेर, उपनगराध्यक्ष मनोज आहेर, नगरसेवक योगेश नानू आहेर, कैलास पवार, शीला आहेर, भूषण गांगुर्डे, नगरसेविका हर्षाली आहेर, शीला आहेर, राखी भिलारे, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, भाजपचे किशोर चव्हाण, बापू देवरे, सुनील देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोठाभाऊ पगार यांनी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here