सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत चांदवड येथे रविवारी (दि.१८) रोजी सायंकाळी ६ वाजता पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी देवळा तालुक्यातून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) गटाचे चांदवड तालुका अध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी केले आहे.
Chandwad-Deola | देवळ्याचा चौथा भिडू विधानसभेच्या मैदानात
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. यामुळे पक्षाची ताकद वाढली असून, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने विधानसभानिहाय आढावा घेत चाचपणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या चांदवड तालुका दौऱ्याच्या निमित्ताने देवळा येथे शुक्रवारी बाजार समितीच्या सभागृहात देवळा तालुका अध्यक्ष पंडितराव निकम यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Chandwad-Deola | विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी; यंदा आमदारकीचा मान देवळा की चांदवडला..?
यावेळी तालुक्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीस मविप्र संचालक विजय पगार, वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे, शेतकी संघाचे चेअरमन संजय गायकवाड, माजी चेअरमन चिंतामण आहेर, कैलास देवरे, संचालक रवींद्र जाधव, देवळा शहराध्यक्ष दिलीप आहेर, यश निकम, दादाजी सोनवणे, डॉ.संजय निकम, मधुकर शेवाळे, शैलेश ठाकरे, अभिजीत ठाकरे, डॉ. किरण आहेर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम