Chandwad-Deola | विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी; यंदा आमदारकीचा मान देवळा की चांदवडला..?

0
101
Chandwad-Deola
Chandwad-Deola

Chandwad-Deola |  राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांनी मतदार संघ पिंजून काढायाला सुरुवात केली आहे. कुठे विरोधकांवर टिका करत तर कुठे शासकीय योजनांचा आधार घेत सत्ताधारी आणि विरोधी गटातील इच्छुकांचा मतदार संघात चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा मतदारसंघातही सध्या इच्छुकांची मोठी रांग दिसत असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे.

चांदवड आणि देवळा या दोन तालुक्यांचा मिळून हा विधानसभा मतदारसंघ असल्याने निवडणूक काळात उमेदवारांकडून मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी देवळा विरुद्ध चांदवड प्रादेशिक वाद निर्माण केला जातो. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांसाठी हा प्रतिष्ठेचा विषय ठरत असल्याने यंदा आमदारकीचा मान कोणत्या तालुक्याला मिळेल. हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Chandwad-Deola | …अन् म्हणे चांदवड-देवळ्यातून आमदारांनी ताईंना लीड दिले; समर्थकांचा ‘कॉन्फिडन्स’ कौतुकास्पदच…

‘दादा’ विरुद्ध ‘नाना’ संघर्ष अटळ..?

मागील दोन निवडणुकांमध्ये देवळा तालुक्यातील असलेले डॉ. राहुल आहेर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर, यंदा त्यांना हॅट्रिक आणि मंत्रीपदाची स्वप्न पडत असल्याने ते तिसऱ्यांदाही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, दरवेळी त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे चुलत बंधु असलेले केदा आहेरही यावेळी इच्छुक असल्याने राहुल आहेर यांच्यामोर घरातूनच तगडे आव्हान उभे राहील, आणि मतदार संघात ‘दादा’ विरुद्ध ‘नाना’ असं समीकरण उभी राहील असं दिसत असलं तरी गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये दोन्ही भावांमध्ये एकविचार असल्याचेही बघायला मिळाले होते. त्यामुळे आता पक्ष कोणत्या भावाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार हे पहावे लागणार आहे. (Chandwad-Deola)

मविआकडे ‘एक से बढकर एक’

दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांकडून ‘एक से बढकर एक’ असे उमेदवार आहेत. काँग्रेसचे दोन वेळा आमदार राहिलेले शिरीष कोतवाल हे प्रमुख दावेदार असून, मागील निवडणुकीत पराभव जरी झाला असला. तरी यंदा त्यांनी पुन्हा जोमाने काम सुरू केल्याचे दिसत आहे.

भाजपला चांदवडमध्ये घाम गळावा लागणार..?

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या पराभूत उमेदवार डॉ. भारती पवार यांना देवळा तालुक्यातून लीड मिळाली. मात्र, चांदवडच्या जनेतेने त्यांना चांगलाच हिसका दाखवला. त्यामुळे देवळा तालुक्यात जरी भाजपसाठी पोषक वातावरण असल्याचे दिसत असले. तरी चांदवडमध्ये मात्र महायुतीच्या उमेदवारांना घाम गाळावा लागणार आहे. याविरुद्ध महाविकास आघाडीसाठी चांदवडमध्ये पोषक वातावरण असले तरी देवळ्यात त्यांना आहेर बंधुंचे आव्हान असणार आहे.

Nashik Lok Sabha | नाशिकचा पराभव पाहता स्वतः आत्मपरीक्षण करणे सोडून शिंदे गटाचे ठाकरे गटाला सल्ले

Chandwad-Deola | ‘हे’ आहेत चांदवड-देवळ्याचे इच्छुक उमेदवार 

  • महायुती

1. विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर

भाजपचे दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री स्व.दौलतराव आहेर यांचे सुपुत्र. सलग दोन वेळा चांदवड देवळा मतदारसंघातून आमदार, तिसऱ्यांदा आमदारकीसाठी इच्छुक.

2. केदा आहेर

केदा आहेर यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य व सभापती, नामको बँकेचे संचालक, मजूर फेडरेशन संचालक, भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष, लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक, नाफेडचे राज्य संचालक, अशी अनेक मोठी पदं भूषवली आहेत.

3. भूषण कासलीवाल

भाजपकडून सलग तीनवेळा आमदार राहिलेले माजी आमदार दिवंगत जयचंद कासलीवाल यांचे पुत्र, भूषण कासलीवाल यांनी चांदवड नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळले आहे. (Chandwad-Deola)

4. डॉ. आत्माराम कुंभार्डे

जिल्हा परिषदेत भाजपचे माजी गटनेते, चांदवड बाजार समितीचे माजी सभापती, सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असून, यंदा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. त्यांनी 2014 च्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवली होती.

5. शिरीष कोतवाल

जिल्हा परिषद सदस्य, चांदवड बाजार समितीत काम, जिल्हा बँकेचे माजी संचालक, चांदवड-देवळा मतदारसंघातून 1999 च्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि 2009 च्या निवडणुकीत अपक्ष असे दोनदा निवडून आले. २०१४ ला कॉंग्रेसकडून उमेदवार, सध्या कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यंदा पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

6. डॉ. सयाजीराव गायकवाड

माजी आमदार ना.का. गायकवाड यांचे पुत्र, चांदवड पंचायत समितीचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष,  मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विद्यमान संचालक, सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात कार्यरत.

7. नितीन आहेर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते. सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, यापूर्वी 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार.(Chandwad-Deola)

8. गणेश निंबाळकर

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक, कांदा प्रश्नावर केलेली आक्रमक आंदोलनं गाजली. शेतकरी आणि स्थानिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचे काम.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here