सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभागातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सुपर फिफ्टी’ परीक्षेचे श्री.शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे संयोजन करण्यात आले. जेईई व नीट परीक्षेच्या कोचींगसाठी प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांना या परीक्षेतुन लाभ देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी २१४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. केंद्रसंचालक म्हणून गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव यांनी काम पाहिले. तर उपकेंद्र संचालक किरण विसावे व मुख्याध्यापिका सुनीता पगार यांनी परीक्षा केंद्रावर नियोजन केले. गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी पूर्ण वेळ थांबून परीक्षेचे सनियंत्रण केले. जिल्हा स्तरावरील निरीक्षक कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन समाधान व्यक्त केले. परीक्षा सुरळीत पणे सुरु ठेवणे कामी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Deola | अभिनव व जनता विद्यालय गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम