सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील मविप्र समाज संचलित, अभिनव व जनता विद्यालयाची विद्यार्थीनी पुर्वा रोहित पाटील हिने ९७.४० टक्के गुण मिळवत माध्यमिक शालांत परीक्षेत विद्यालयातुन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असुन, परीक्षेसाठी एकुण ४१ विद्यार्थी प्रविष्ट होते. यातील ३३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर आठ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यात कु. पुर्वा रोहित पाटील हिने ९७.४०% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.
Deola | देवळा येथे श्री बालाजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ
तर, सिद्धी यादव पवार ९६.६०% द्वितीय, सोहम विनोद मराठे ९५.२०%, दिपाली बारकू सूर्यवंशी ९५.२०% अनुक्रमे तृतीय, श्रावणी महेंद्र गुंजाळ ९४.८०% चतुर्थ, श्रुती सुनील आहेर ९४% पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे ‘मविप्र’ संंस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे, देवळा तालुका संचालक विजय पगार, शालेय समितीचे अध्यक्ष योगेश आहेर, प्रदिप आहेर सर्व सदस्य, माध्य. शिक्षणाधिकारी डॉ. भास्करराव ढोके, शाळेचे मुख्याध्यापक मनिष बोरसे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले.
Deola | व्हीकेडी ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल; श्रेयस सोनवणे विज्ञान शाखेत प्रथम
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम