Deola | शेरी पिचड निवासी आश्रमशाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरा

0
28
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | शेरी (ता.देवळा) येथील मा. मधुकर रावजी पिचड प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आदिवासी निवासी आश्रमशाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत मुलींनी मुलांना तसेच गावातील स्थानिक नागरिकांना व शिक्षकांना राख्या बांधल्या. रक्षाबंधन निमित्त जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र निवासी आश्रम शाळांना सुट्टी नसल्याने या सणाला विद्यार्थी आपल्या गावी जाऊ शकले नाहीत.

Deola | देवळ्यात सालाबादप्रमाणे कावड यात्रा संपन्न; केदा आहेर यांना राखी बांधून महिलांनी मानले आभार

यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेतच रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. यावेळी सोसायटीचे चेअरमन गुलाब आण्णा पवार, पोलीस पाटील धनाजी महाले, रमेश सोनवणे, सीताराम महाले आदी ग्रामस्थांसह मुख्याध्यापक हर्षाली गुंजाळ, शिक्षक दिपक आहेर, सानप सर, अधीक्षक सचिन पगार, नितीन देवरे, दिपाली रौदंळ, रविंद्र आहिरे, दिपक पाटील, देविदास पवार, बिजली पवार आदी कर्मचारी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here