देवळा : खामखेडा (ता.देवळा) येथील अशोक शेवाळे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने त्यांच्यावर जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राज्यभरात काम करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राज्य समन्वयक कुबेर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध ठराव करण्यात आले.
Deola | शेरी पिचड निवासी आश्रमशाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरा
शेतकरी संघटनेत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले खामखेडा येथील अशोक शेवाळे यांची जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली. शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी चळवळीत अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून यांची दखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेऊन येवला येथील कार्यकारणी बैठकीमध्ये त्यांची निवड करण्यात आली. यावेळी राज्य समन्वयक कुबेर जाधव, जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, राजू शिरसाठ, युवा जिल्हाध्यक्ष तुषार शिरसाठ, कर्जमुक्ती सल्लागार सुधाकर मोगल, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र शेवाळे, देवळा तालुकाध्यक्ष कैलास कोकरे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम