सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे (ता. देवळा) येथे सोमवारी (दि. २४) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, छोटे मोठे ओहळ नाल्यांना पूर आला. मूलूखवाडी येथेहि जोरदार पाऊस झाल्यावर निवाने बारी घाटात दरड कोसळली असून, वाहतूक ठप्प झाली आहे. खर्डे व परिसरात सुरवातीला पेरणीयुक्त पाऊस झाला. पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला.
दरम्यान, सोमवारी दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दुपारी तीन वाजता मुसळधार पावसाने दिलासा दिला. मुलुखवाडी येथील पाझर तलाव पूर पाण्याने भरून गेला. खर्डेसह मुलूखवाडी येथे मुसळधार पाऊस झाला असून, कधी नव्हे असा ढगफुटी सदृश्य पावसाने शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. शेतातले बांध फुटल्याने नुकसान झाले. तसेच ओहळ, नाल्यांना देखील पूर आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Deola | खर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अनिल रामदास देवरे बिनविरोध
दरम्यान, मुलूखवाडी, मोतीनंदर शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने येथील निवाने बारी घाटात दरड कोसळली. रस्त्यावर मोठ मोठे दगड येऊन पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुलूखवाडी शिवारात शेतात पाणी साचले असून, येथील पाझर तलाव भरला. निवाने बारीत दरड कोसळली. मात्र, यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून, प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन रस्ता वाहतुकीस खुला करावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद मोरे, मुलूख वाडी येथील विठोबा चव्हाण यांनी केलीआहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम