सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मेशी (ता.देवळा) येथे आमदार निधीतून मंजूर असलेल्या प्रलंबित सभामंडपाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी येथील माजी सैनिक प्रविण बोरसे यांनी १५ ऑगस्ट रोजी येथील जगदंबा चौकात सकाळी नऊ वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी दुपारी बारा वाजता मेशी येथे येऊन उपोषणकर्ते यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.
Deola | चांदवड- देवळा मतदारसंघातील पन्नास टक्के लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ
यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवळा येथील सहाय्यक अभियंता विजय काळे यांच्याकडून पाच सप्टेंबरपर्यंत सभामंडपाचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्याचे आश्वासन घेत बोरसे यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले असता त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, मंडल अधिकारी ढोके, पोलीस पाटील हेमंत पगार, तलाठी अंबादास पुरकर, पोलीस हवालदार सोनवणे, शिरसाठ उपस्थित होते.
केदा आहेर यांच्या मध्यस्थीने आपण उपोषण मागे घेतले असून पाच सप्टेंबर पर्यंत सभामंडपाचे अपूर्ण काम पूर्ण झालेच पाहिजे. नाहीतर परत उपोषणास बसण्याची वेळ येऊ नये. उपोषणस्थळी महसूल विभागामार्फत नायब तहसिलदार येणे अपेक्षित असताना मंडलअधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. याबाबत महसूल प्रशासनाची उदासीनता दिसून येते.
–प्रवीण बोरसे (उपोषणकर्ते, माजी सैनिक)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम