Nashik News | लाडक्या बहिणींच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री भूसेंची अचानक बँकेला भेट

0
50
Nashik News
Nashik News

Nashik News |  राज्य शासनाच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेला (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून म्हणजेच १४ ऑगस्टपासून लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यावर ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले नव्हते. त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी तर ज्या महिलांना पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर मिळाले. त्यांनी जमा झालेले पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर मोठी गर्दी केली आहे. (Nashik News)

Nashik Voilence | दोषींवर कठोर कारवाई करणार; पालकमंत्री दादाजी भुसे यांचे प्रशासनाला सक्त निर्देश

या पार्श्वभूमीवर आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंची (Dadaji Bhuse) अचानक बँकेत भेट दिली आणि पाहणी केली. द्वारका परिसरातील एसबीआय बँक शाखेत जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. लाडकी बहीण योजनेच्या बाबत केली बँकेत पाहणी केली. तसेच उपस्थित महिला आणि बँक प्रशासनाशी संवाद साधत आढावा घेतला. यावेळी महिलांची गर्दी जास्त असून काउंटर कमी असल्याने बँक प्रशासनाला काउंटर वाढवण्याबाबत सूचना दिल्या. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी आता कोणतीही अंतिम मुदत नसून, १७ ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. (Nashik News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here