देवळा ; येत्या रविवारी (दि१०) रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद तसेच होऊ घातलेल्या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी केले .
आषाढी एकादशी व बकरी ईद तसेच होऊ घातलेल्या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि६) रोजी देवळा पोलीस ठाण्यात पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते . बैठकीला पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे , निलेश सावकार ,नइम शेख आदींसह तालुक्यातील सर्व गाव कामगार पोलीस पाटील उपस्थित होते.
येत्या रविवारी (दि१०) रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद सणाला कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संबंधित गावातील पोलीस पाटलांनी सतर्क राहावे , तसेच होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पाटलांनी उमेदवारांना सूचना कराव्यात . या आधी तालुक्यातील सर्व सण उत्सव तसेच निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत .त्यानुसार होऊ घातलेले सण उत्सव ,निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे , कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा ,असे शेवटी गायकवाड यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम